जुन्या वॉशिंग मशिनसाठी मोजले अडीच लाख
जुन्या वॉशिंग मशीनसाठी मोजले अडीच लाख
डॉक्टर तरुणीची फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः भायखळा येथे राहणाऱ्या डॉक्टर तरुणीला ऑनलाइन खरेदीत जुन्या वापरत्या (सेकंड हॅण्ड) वॉशिंग मशीनसाठी तब्बल अडीच लाख मोजावे लागले. समाजमाध्यमांवरील फसव्या जाहिरातीत या यंत्राची किंमत अवघी चार हजार रुपये इतकी दर्शविण्यात आली होती.
अडीच लाख रुपये मोजल्यानंतर महिलेस फसवणुकीची जाणीव झाली. त्यानंतर तिने भायखळा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. भायखळा पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. हा प्रकार १९ जून रोजी घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ जून रोजी फेसबुकवरील बाय ऑन सेल हे पेज तरुणीच्या पाहण्यात आले. त्यात नवी, वापरती गृहोपयोगी वस्तू, यंत्रे माफक दरात उपलब्ध होती. तिला वॉशिंग मशीन घ्यायची होती. या पेजवरील एक मशीन तिला पसंत पडली. तिने पेजवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने मशीनची किंमत चार हजार रुपये सांगून उद्या ती घरपोच होईल, मशीन घरी पोहोचली की पैसे द्या, असे सांगितले.
१९ जून रोजी डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवून एका व्यक्तीने या तरुणास संपर्क साधला. त्याने विमानतळावरून निघत असल्याचे सांगून गेट फी, सुरक्षा शुल्क अशी विविध कारणे सांगून तरुणीकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. ही रक्कम तुम्हाला परत मिळेल, असे सांगून या व्यक्तीने तरुणीकडून हजार, दोन हजार, सहा हजार असे करत करत तब्बल अडीच लाख रुपये भरण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे मागणीप्रमाणे ही तरुणी पैसे भरत गेली. हा प्रकार अडीच लाखांवर पोहोचताच आणखी पैशांची मागणी होऊ लागल्याने तिच्या मनात अखेर शंकेची पाल चुकचुकली आणि तिने पुढील रक्कम भरण्यास नकार दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.