सौर कृषी पंपाबाबत तक्रारी आॅनलाईन करा!
सौर कृषी पंपाबाबत तक्रारी आॅनलाइन करा!
महावितरणचे शेतकऱ्यांना अवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : राज्यात विविध योजनांच्या माध्यमातून आतापर्यंत पाच लाख ६५ हजारांहून अधिक सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत. तसेच आणखी पाच लाख सौर कृषी पंप बसविण्यात येणार आहेत. त्यात काही बिघाड झाल्यास त्याबाबतच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला असून, शेतकऱ्यांना घरबसल्या फोनवरून अथवा ऑनलाइन तक्रार करता येईल, अशी सुविधा उपलब्ध केली आहे. शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
वादळी वाऱ्यांमुळे आणि मुसळधार पावसामुळे मे महिन्यात काही ठिकाणी सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स कोसळून नुकसान झाले. अशा प्रकारच्या विविध समस्या सोडविण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. सौर कृषी पंप बसविल्यानंतर पंप चालत नसणे, सौर पॅनेलची नासधूस होणे, सौरऊर्जा संच काम करीत नाही, सौर पॅनेल्सची किंवा पंपाची चोरी होणे अथवा पंपातून कमी दाबाने पाणी येणे अशा विविध तक्रारी शेतकरी करू शकतील. सौर कृषी पंप संचाचा विमा उतरविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना महावितरणच्या टोल फ्री नंबरवर फोन करून किंवा महावितरणच्या संबंधित वेबसाईटवर ऑनलाइन नोंदणी करून किंवा थेट संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर नोंदणी करून तक्रार नोंदविता येईल. तक्रार नोंदविताना शेतकऱ्याने सौर कृषी पंपाचा लाभार्थी क्रमांक लिहिला तर पुरेसे आहे. शेतकरी आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लिहूनही तक्रार करू शकतात. आपला जिल्हा, तालुका, गाव आणि स्वतःचे नाव अशी माहिती देऊनही तक्रार करता येईल.
तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक : १८००-२३३-३४३५ व १८००-२१२-३४३५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.