उपाहारगृहाच्या बांधकामांचे निष्कासन
उपाहारगृहाच्या बांधकामांचे निष्कासन
कमला मिलमध्ये पालिकेची कारवाई
मुंबई, ता. ९ : कमला मिल परिसरातील ‘लिव्हिंग लिक्विडस्’ या आस्थापनावर महानगरपालिकेने मोठी कारवाई करत त्यांचे दोन्ही उपाहारगृहांचे परवाने रद्द केले असून अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे. गारमेंट व टेलरिंग शॉपच्या जागी बेकायदा रेस्टॉरंट, बार आणि वाइन शॉप सुरू केल्याचे उघडकीस आले होते.
महापालिकेच्या पथकाने ४ व ५ ऑगस्ट रोजी केलेल्या संयुक्त पाहणीत चटई क्षेत्र मर्यादा उल्लंघन, गच्चीवर छत उभारणे, भिंती आणि दरवाजांच्या रचनेत बदल, शीतगृह उभारणी अशा अनेक अनियमितता आढळल्या. त्यानंतर नोटीस बजावून निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच अग्निसुरक्षा प्रमाणपत्र न घेता सुरू असलेले व्यवसाय सार्वजनिक सुरक्षेला धोका असल्याने दोन्ही परवाने रद्द करण्यात आले.
ही कारवाई उपायुक्त प्रशांत सपकाळे व सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्या नेतृत्वात आरोग्य, कारखाना, इमारत आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहकार्याने पार पडली. यापुढेही अशी कारवाई सातत्याने करण्यात येणार असून, कायदाभंग करणाऱ्या आस्थापनांना सोडले जाणार नाही, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.