विनातिकीट रेल्वे प्रवाशांकडून ८६.७३ कोटींची दंड वसुली
विनातिकीट रेल्वे प्रवाशांकडून ८६.७३ कोटींची दंड वसुली
मुंबई विभाग दुसऱ्या क्रमांकावर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास सुविधा देण्यासाठी मध्य रेल्वे नियमितपणे मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर, विशेष ट्रेनमध्ये तसेच मुंबई व पुणे विभागातील उपनगरी ट्रेनमधील सर्व विभागांमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबवते. मध्य रेल्वेने एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीत तिकीट तपासणीत विनातिकीट १४.४३ लाख प्रवाशांना पकडले असून त्यांच्याकडून एकूण ८६.७३ कोटींचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमध्ये मुंबई विभाग दुसऱ्या क्रमांकावर, भुसावळ विभाग अव्वल आहे. रेल्वे बोर्डाने या कालावधीसाठी निश्चित केलेल्या ८१.४८ कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे उत्पन्न ६.४४ टक्क्यांनी वाढले असून तिकीट तपासणीमधून मिळालेल्या महसुलामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
...
आर्थिक वर्ष (एप्रिल ते जुलै २०२५)
विनातिकीट प्रवासी - १४.४३ लाख
दंडवसुली - ८६.७३ कोटी
...
जुलै २०२४
विनातिकीट प्रवासी - १.९१ लाख
दंडवसुली - ७.९७ कोटी
...
जुलै २०२५
विनातिकीट प्रवासी - ३.०८ लाख
दंडवसुली - १६.०० कोटी
...
विभागानुसार विनातिकीट कारवाई
विभाग - प्रकरणे - दंडवसुली (कोटी रुपये)
भुसावळ - ३.८५ लाख - ३३.४९
• मुंबई - ५.७३ लाख - २४.२९
• नागपूर - १.५६ लाख - ९.७६
• पुणे - १.५२ लाख - ८.४२
• सोलापूर - ८५ हजार - ४.१८
• मुख्यालय - ९१ हजार - ६.५८