स्वातंत्र्यात काँग्रेसच्या नेतृत्त्वाचे मोठे योगदान

स्वातंत्र्यात काँग्रेसच्या नेतृत्त्वाचे मोठे योगदान

Published on

स्वातंत्र्यात काँग्रेसच्या नेतृत्वाचे मोठे योगदान
हर्षवर्धन सपकाळ : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान खोटे बोलत असल्याचा आरोप
मुंबई, ता. १५ : प्रचंड मोठा संघर्ष व हजारो, लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानानंतर देशाला स्वांतत्र्य मिळाले असून, काँग्रेसचे नेतृत्व व कर्तृत्व याचे त्यात मोठे योगदान आहे. लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान जे बोलत त्याप्रमाणे वागत होते, पण त्याला मागील ११ वर्षांत बगल देऊन फक्त खोटे बोलले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जे बोलले तेही खोटेच बोलले, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. टिळक भवन येथे स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी सपकाळ यांनी उपस्थिताना संबोधित केले.
स्वांतत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत सपकाळ म्हणाले, की भारताची फाळणी ही एक दुःखद घटना आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल होते म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर ६०० देश झाले असते. फाळणीचे दुःख आहेच, पण भाजप सरकार १३ ऑगस्टला मंत्रालय रात्रभर उघडे ठेवून फाळणीचा दिवस साजरा करण्याचा फतवा काढते, हा काय प्रकार आहे? १९४२चे चले जाव आंदोलन सुरू होते, तेव्हा रा. स्व. संघ, सावरकर कुठे होते, हे पंतप्रधानांनी सांगायला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणी मोठी किंमत मोजली, हे सर्वांना माहीत आहे. देशात आज बेशिस्त वाढली आहे आणि ती काँग्रेसच दूर करू शकते. देशाचा व काँग्रेसचा डीएनए एकच आहे, असेही सपकाळ म्हणाले.

फसवी घोषणा
तरुणांना १५ हजार रुपये देण्याच्या पंतप्रधानांच्या विधानावर बोलताना सपकाळ म्हणाले, की दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू, यांसारख्या घोषणा यांनीच दिल्या होत्या. पण त्याचे पुढे काय झाले, हे आपण पाहिले आहे. त्यांचा आतापर्यंतचा अनुभव पाहता ही घोषणासुद्धा फसवीच ठरेल, असेही सपकाळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com