मिठी नदीचे पाणी सखल भागात शिरल्याने वीज पुरवठा बंद

मिठी नदीचे पाणी सखल भागात शिरल्याने वीज पुरवठा बंद

Published on

मिठी नदीचे पाणी सखल भागात शिरल्याने वीजपुरवठा बंद
कुर्ला, कमानी, क्रांतिनगर, तकीय वॉर्ड, शिक्षक नगरातील रहिवाशांचे हाल; एका बाजूला घरात पाणी आणि दुसरीकडे काळोख
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः पहाटेपासून धुवाधार कोसळणाऱ्या पावसामुळे आज मंगळवार (ता. १९) सकाळपासून मिठी नदीच्या पाण्यालगतच्या कुर्ला, कमानी, क्रांतिनगर, तकीय वॉर्ड, शिक्षकनगर, कुर्ला डेपो, टॅक्सीमन कॉलनी परिसरातील घरात शिरले. त्यामुळे अदाणी इलेक्ट्रिसिटीने खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी आठ वाजल्यापासून वीजपुरवठा बंद केला. त्यामुळे एकीकडे घरात पाणी आणि काळोख झाल्याने झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांचे प्रचंड हाल झाले.
मिठी नदीचे पात्र आधीच अतिक्रमणामुळे अरुंद झाले आहे. तसेच पालिकेने पुरता गाळही काढलेला नाही. तसेच विहार आणि तुळशी तलाव पूर्ण भरल्याने संजय गांधी उद्यानात पडणारे पावसाचे संपूर्ण पाणी येत असल्याने सकाळपासून मिठी नदीने धोक्याच्या पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कुर्ला डेपो, क्रांतिनगर, कपाडियानगर, टॅक्सीमन कॉलनी, शिक्षकनगर, हरी मस्जिद, कुर्ला गार्डन, साईनाथनगर, महाराष्ट्रनगर परिसरात पाणी भरल्याने अनेकांच्या घरात पाणी भरले. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन अपघात घडू नये म्हणून अदाणी इलेक्ट्रिसिटीने वीजपुरवठा खंडित केल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय झाली.

ना बसायला जागा, ना जेवण
सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसाने आमच्या घरात पाणी भरले आहे. त्यामुळे स्वयंपाक करता आला नाही. सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही उभे आहोत. बसायला ना कोरडी जागा आहे, ना जेवण अशी परिस्थिती असल्याची खंत शिवाजी यमगर या परीघ खाडी येथील रहिवाशाने व्यक्त केली. तसेच पाऊस आणखी किती येणार, पाणी कमी होणार की वाढणार, याची चिंता असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालिकेने गटारे, नाले आणि मिठी नदी व्यवस्थित साफ केलेली नाही. त्यामुळेच पाणी वाहून न जाता अडून राहत आहे. त्यामुळे थोडा जरी पाऊस आला तरी घरात पाणी शिरत आहे.
- विलास पाखरे, रहिवासी

आधीच पावसाचे पाणी घरात शिरलेले असतानाच दुपारी आलेल्या भरतीमुळे मिठी नदीतील घाण पाणीही घरात आले आहे. त्यामुळे घरात उभे राहणेही कठीण झाले आहे.
- आफताब कुरेशी, रहिवासी

पालिका, सरकार सतर्कतेचा इशारा देऊन मोकळे झाले आहे; पण आज आमच्या घरात शिरणाऱ्या पाण्याला जबाबदार कोण, आमच्या घरात घुसणारे पाणी कधी थांबणार, याबाबत कोणीच बोलत नाही, उपाययोजना करत नाही. वर्षानुवर्षे हीच परिस्थिती आहे.
- कमलाकर काळे, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com