उशीरा सुट्टी जाहीर; डबेवाल्यांचा 80 टक्के व्यवसाय बुडाला
उशिरा सुट्टी जाहीर; डबेवाल्यांचा ८० टक्के व्यवसाय बुडाला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका मुंबईच्या डबेवाल्यांना बसला आहे. मंगळवारी (ता. १९) तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे जवळपास ८० टक्के डबे कार्यालयात पाहोचू शकले नाहीत. मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना उशिरा सुट्टी जाहीर केल्यामुळे आमची अडचण झाल्याचे डबेवाल्यांनी सांगितले.
सलग दुसऱ्या दिवशी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे रुळावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे लोकल रेल्वे सेवा ठप्प झाली होती. शाळा, महाविद्यालयांना सोमवारी रात्री सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे जवळपास २० हजार डबे तसेच कमी झाले होते. मात्र सरकारी आणि निमशासकीय कार्यालयांना आज (ता. १९) सकाळी ९.३०च्या दरम्यान सुट्टी जाहीर करण्यात आली. तसेच मुंबई महानगरातील सर्व खासगी कार्यालये, आस्थापनातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा देण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले होते. मात्र तोपर्यंत डबेवाल्यांनी घरातून डबे गोळा केले होते, असे डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी सांगितले.
मध्य व हार्बर लाईनवरील कार्यालयातील डबे वितरणावर याचा मुख्य परिणाम झाला. या दोन्ही मार्गावरच्या लोकलमध्ये डबेवाले चढले होते; मात्र पाणी ट्रॅकवर आल्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली. परिणामी अर्धा-एक तास वाट पाहून डबेवाल्यांना परत निघावे लागले. जिथे पाणी साचले नाही, अशा ठिकाणी पश्चिम रेल्वे मार्गावर डबे पोहोचवल्याचे मुके यांनी सांगितले.
पावसामुळे ९० टक्के डब्यांची सेवा पोच करू शकलो नाही. ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे.
- उल्हास मुके, अध्यक्ष, मुंबई डबेवाले संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.