तकियावार्डच्या राजाला सामाजिक बांधिलकीची परंपरा

तकियावार्डच्या राजाला सामाजिक बांधिलकीची परंपरा

Published on

तकियावार्डच्या राजाला सामाजिक बांधिलकीची परंपरा
वर्षभर आरोग्य शिबिर, नेत्रतपासणीसारखे स्तुत्य उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : कामगार वस्ती असलेल्या कुर्ला परिसरात गेल्या साडेसहा दशकांपासून कुर्ल्याचे बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ‘तकियावार्डच्या राजाने’ सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम राखली आहे. गणेशोत्‍सव काळात वेगवेगळे सामाजिक, शौक्षणिक कार्यक्रम राबवतानाच आरोग्य तपासणी शिबिर, नेत्रतसापणी, रक्तदान अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन केले जात आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक आणि वैचारिक उन्नती साधता यावी, समाजाला जागृत करता यावे, यासाठी लोकमान्य टिळकांनी १८९४ साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. तीच परंपरा १९६३ पासून ‘तकियावार्डचा राजा’ अशी ओळख असलेल्या कुर्ल्याच्या बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कायम ठेवली आहे. सालाबादप्रमाणे गणेशोत्सव काळात लहान मुलांची चित्रकला स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खेळांच्या स्पर्धा, विभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर, मोफत डोळे तपासणी व चष्मेवाटप अशा कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती मंडळाचे खजिनदार अक्षय नखाते यांनी दिली.

वर्षभरात ३०० लोकांची आरोग्य तपासणी
तकियावार्डचा राजा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सुमारे ३०० लोकांची तपासणी करून त्यांना आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले. तसेच नेत्रतपासणी शिबिरात २०० लोकांची तपासणी करून त्यांना चष्मेवाटप केले.

आकर्षक देखावा
गणेशोत्सव मंडपात मंडळाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हिरव्या रंगातील आकर्षक देखावा साकारला आहे. तसेच ऋषिमुनी महाभारत सांगत असून गणपती लिहून घेत असल्याची यंदाची थीम आहे. त्यामुळे गणेशभक्तांकडून देखावा पाहण्यासाठी गर्दी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com