गणरायाच्या देखाव्यातून घडवले ‘मुंबई दर्शन’

गणरायाच्या देखाव्यातून घडवले ‘मुंबई दर्शन’

Published on

गणरायाच्या देखाव्यातून घडवले ‘मुंबई दर्शन’
सायनमधील रोकडे परिवाराचा देखावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : गणेशोत्सव म्हटले की प्रत्येक मंडळ व घरगुती गणपतीमागे वेगळी संकल्पना, वेगळे आकर्षण असते. यंदा सायनमधील रोकडे परिवाराचा घरगुती गणराय भक्तांना मुंबई दर्शनाचा अद्भुत अनुभव देत आहे. जान्हवी रोकडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्त अक्षरशः रांगा लावत आहेत.
या संकल्पनेला आकार देण्यासाठी जान्हवी रोकडे यांनी तब्बल दोन महिने रात्रंदिवस मेहनत घेतली. त्यांच्या या अथक प्रयत्नांतून केवळ एक सजावट नव्हे तर संपूर्ण मुंबईचा आत्मा उभा राहिल्याचे चित्रच पाहायला मिळत आहे. दरवर्षी त्या अशाप्रकारे देखावे उभे करून सामाजिक संदेशासह अद्भुत कलेचा नमुना सादर करतात.
बेस्टची लाल बस, वाळकेश्वर येथील म्हातारीचा बूट, वरळी सी-लिंक, गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, सिद्धिविनायक मंदिर, तारापोरवाला मत्स्यालय, जिजामाता उद्यान, एलिफंटा लेणी आणि नेहरू तारांगण अशी मुंबईची प्रतीके हुबेहूब उभारण्यात आली आहेत. समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, प्लॅस्टिकमुक्त आणि प्रदूषणविरोधी जागृतीचा संकल्प भक्तांसमोर ठेवण्यात आला आहे. आमचे समुद्रकिनारे ही केवळ सार्वजनिक ठिकाणे नसून पवित्र आश्रयस्थाने आहेत, असा संदेश देण्याचा प्रयत्‍न केला आहे.

गणरायाच्या देखाव्यातून मी फक्त मुंबईचे सौंदर्य नाही तर पर्यावरण आणि स्वच्छतेचे महत्त्वही अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. भक्तांनी बाप्पाच्या दर्शनासोबत आपल्या शहराची जबाबदारीही घ्यावी, हाच माझा संदेश आहे.
- जान्हवी रोकडे, गणेशभक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com