फेरीबोटी धरणार तंत्रज्ञानाची कास
फेरी बोटी धरणार तंत्रज्ञानाची कास
ई-तिकीटसोबत, ट्रॅकिंग प्रणाली विकसित होणार
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबईच्या पारंपरिक फेरी बोटी आता डिजिटल युगात पाऊल ठेवत आहेत. भाऊचा धक्का ते रेवस, उरण, मोरा, तसेच गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा, एलिफंटा, अलिबाग या मार्गांवरील प्रवास आता अधिक सोयीस्कर, पारदर्शक व सुरक्षित होणार आहे. ई-तिकीट खरेदी प्रणालीसह बोटीची रियल टाइम माहिती प्रवाशांना लवकरच उपलब्ध होणार आहे. सागरी महामंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात एक बैठक नुकतीच पार पडली.
मुंबई व आसपासच्या समुद्रकिनारी असलेली गावे, छोटे बंदर आणि पर्यटनस्थळासोबत जोडणाऱ्या पारंपरिक फेरी बोटी सेवा अनेक दशकांपासून प्रवासी वाहतूक करीत आहेत. गेल्या काही वर्षांत आधुनिक वॉटर टॅक्सी आणि रो-रो सेवा सुरू झाल्या असल्या तरी स्वस्त, सोयीस्कर आणि मोठ्या प्रवासी क्षमतेमुळे पारंपरिक फेरी बोटींची लोकप्रियता अजूनही कायम आहे. रो-रो बोटींची तिकिटे ऑनलाइन खरेदी करता येतात; मात्र वर्षानुवर्षे प्रवासी सेवा देणाऱ्या पारंपरिक फेरी बोटी प्रवासासाठी ई-तिकीट सुविधा नव्हती. आता सुमारे १५० नोंदणीकृत फेरी बोटींना नव्या डिजिटल सुविधेचा फायदा मिळणार आहे. यापूर्वी फेरी बोटचालकांना प्रत्येक तिकिटांवरील सागरी कर (नेव्ही) सागरी महामंडळाकडे जमा करावा लागत होता. ई-तिकिटिंग प्रणालीमुळे आता तिकीट रक्कम थेट सागरी महामंडळाकडे जमा होईल, तर उर्वरित रक्कम बोट मालकांकडे वर्ग केली जाईल. या प्रक्रियेवर सागरी महामंडळाचे पूर्ण नियंत्रण राहणार आहे. ज्यामुळे पारदर्शकता, व्यवस्थापन सुधारणा आणि महसूल वितरण अधिक सुस्थितीत होईल.
...
बोटींची सुरक्षितता
गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा बेटाकडे जाणाऱ्या एका लाकडी फेरी बोटीच्या अपघातानंतर समुद्री सुरक्षा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर फेरी बोटचालक व संचालकांनी सुरक्षिततेसाठी बोट ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्याचे निर्णय घेतले आहेत. ही प्रणाली भारतीय नौदलाकडून विकसित केली जात आहे. या प्रणालीअंतर्गत समुद्रात कोणती बोट कुठे आहे, याची रियल टाइम माहिती सागरी महामंडळ आणि मुंबई पोर्ट ट्रस्टकडे उपलब्ध राहणार आहे. यामुळे अपघात टाळणे, प्रवासी सुरक्षितता सुधारणा आणि फेरी बोटींच्या सुरक्षिततेची हमी मिळवणे शक्य होणार आहे. ही प्रणाली पारंपरिक फेरी बोटी सेवा आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा महत्त्वाचा टप्पा ठरेल. प्रवाशांना तिकीट खरेदी सोपी होईल आणि बोटींची सुरक्षितता सुनिश्चित करता येईल, असे सागरी महामंडळाचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
...
फेरी बोटी डिजिटल अपडेट
१. पारंपरिक फेरी बोटींसाठी लवकरच ई-तिकीट प्रणाली मोबाईल ॲपद्वारे तिकीट खरेदी करता येणार. सुमारे १५० नोंदणीकृत बोटींना फायदा
२. थेट सागरी महामंडळाकडे पैसे जमा होणार. प्रत्येक तिकिटावरील सागरी कर थेट जमा होऊन उर्वरित रक्कम बोट मालकांकडे जाणार. पारदर्शकता व व्यवस्थापन सुधारणा होणार
३. कोणती फेरी बोट कुठे आहे, सागरी महामंडळ आणि मुंबई पोर्ट ट्रस्टकडे रियल टाइम माहिती उपलब्ध असणार
४. सुरक्षा व सुविधा अपघात टाळण्यास मदत होणार. प्रवासी सुरक्षितता वाढविण्यासाठी पारंपरिक फेरी बोटी सेवा आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडली जाणार
५. लोकप्रिय मार्ग भाऊचा धक्का- रेवस- उरण- मोरा- गेटवे ऑफ इंडिया- मांडवा- एलिफंटा- अलिबाग स्वस्त, सोयीस्कर, मोठ्या क्षमतेच्या फेरी बोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.