Anna Bhau Sathe
Anna Bhau Sathesakal

अण्णा भाऊंच्या रशिया प्रवासाची पासष्टी

Published on

अण्णा भाऊंच्या रशिया प्रवासाची पासष्टी
विचारमंथनासाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः महाराष्ट्राचे प्रसिद्ध लोकशाहीर, थोर साहित्यिक अण्णा भाऊ साठे हे सोव्हिएत रशियात पाच जणांच्या भारतीय शिष्टमंडळासोबत गेलेल्या घटनेला शनिवार, १३ सप्टेंबरला ६५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या प्रवासाच्या आठवणीसाठी मागील वर्षापूर्वी मुंबई विद्यापीठाच्या पुढाकाराने रशियातील निकोलो यामस्काया स्ट्रीट येथे अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला. तसेच मुंबई विद्यापीठातील अध्यासनाने थेट रशियात अण्णा भाऊ साठे यांच्या या प्रवासाच्या आठवणी अधिक अधोरेखित व्हाव्यात यासाठी रशियात जाऊन दोन आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजनही केले.
इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटीतर्फे १३ सप्टेंबर १९६० रोजी सोव्हिएत रशियाला भारतीय सांस्कृतिक शिष्टमंडळ गेले होते. त्या राज्यातून एकमेव प्रतिनिधी म्हणून अण्णा भाऊ साठे यांचा समावेश होता. त्यानिमित्ताने वरळीत त्यांचा रशियाला जाण्यापूर्वी ७ सप्टेंबर १९६० रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते मोठा सत्कारही करण्यात आला होता. अण्णा भाऊंचे जिवलग मित्र असलेले प्रा. चंद्रकुमार नलगे म्हणाले, ‘‘ते रशियाला जाण्यापूर्वी आणि परत आल्यानंतर त्यांचे मोठे स्वागत झाले होते. ते लौकिक अर्थाने कष्टकरी, उपेक्षित आणि वंचित घटकांची व्यथा मांडणारे साहित्यिक होते.’’ अण्णा भाऊंच्या साहित्याचे अभ्यासक चंद्रकांत वानखेडे म्हणाले, ‘‘अण्णा भाऊंनी रशियातील पत्रकारांना तिथे आपण रशियन क्रांती झाल्यानंतर येथील जनता कशी जगते, यासाठीचे दिलेले उत्तर खूप मार्मिक होते.’’ त्यांच्या असंख्य आठवणींवर आपण लिहिले असल्याचेही ते म्हणाले.
...
प्रवासवर्णनामुळे संबंध दृढ
रशियातील प्रवासावर आधारित अण्णा भाऊंनी ‘माझा रशियाचा प्रवास’ हे प्रवासवर्णन लिहिले. त्याची मराठीसह रशियन अशा अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली. ती खूप गाजली. शेकडो अभ्यासकांनी त्यावर समीक्षणे लिहिली, संशोधन केले. त्यांच्या या प्रवासवर्णनातून भारत आणि सोव्हिएत रशियातील संबंध अधिक दृढ होण्यासाठी मोठी मदत झाली.
...
रशियात अण्णा भाऊंचा पुतळा
रशियातील निकोलो यामस्काया स्ट्रीट, मास्को येथे अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. यासाठी सप्टेंबर २०२२मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आदींच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला होता. यासाठीची जबाबदारी प्रा. बोरिस झाखारीन, डॉ. संजय देशपांडे, मुंबई विद्यापीठातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. बळीराम गायकवाड, बार्टीचे संचालक सुनील वारे आदींनी घेतली होती.
...
दोन आंतरराष्ट्रीय परिषदा
मुंबई विद्यापीठातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राच्या पुढाकाराने मॉस्को रशिया येथे दोन आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन झाले. यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. रवींद्र कुलकर्णी, विद्यापीठातील अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. गायकवाड आदींनी योगदान दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com