प्रारूप प्रभाग रचनेवरील २७७ हरकती व सूचनांवर आज सुनावणी

प्रारूप प्रभाग रचनेवरील २७७ हरकती व सूचनांवर आज सुनावणी

Published on

२७७ हरकती व सूचनांवर सुनावणी
महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रारूप प्रभागरचना

मुंबई, ता. ११ : महापालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५च्या प्रारूप प्रभागरचनेवरील हरकती व सूचनांवर मागील दोन दिवसांपासून सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत आज गुरुवारी (ता. ११) एकूण २७७ हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यात आली.
या सुनावणीस राज्य सरकारने नियुक्त केलेले प्राधिकृत अधिकारी आणि राज्याचे अपर मुख्य सचिव (गृह) इकबालसिंग चहल उपस्थित होते. तर महापालिकेच्या वतीने अतिरिक्त पालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहआयुक्त (निवडणूक व करनिर्धारण) विश्वास शंकरवार तसेच सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध टप्प्यांनुसार २२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. सुनावणीच्या पहिल्या दिवशी (ता. १०) १८९ हरकती व सूचनांची सुनावणी झाली होती. तर आजच्या सुनावणीसह दोन दिवसांत मिळून एकूण ४६६ हरकती व सूचनांवर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

उर्वरित हरकतींवर आज सुनावणी
उर्वरित हरकती व सूचनांवरची सुनावणी उद्या शुक्रवारी (ता. १२) होणार आहे. हरकतदार नागरिकांनी यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉइंट, मुंबई येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com