शस्त्रसाठा चोरीची माहिती पोलिसांना मिळेपर्यंत आरोपी तेलंगणमध्ये दाखल

शस्त्रसाठा चोरीची माहिती पोलिसांना मिळेपर्यंत आरोपी तेलंगणमध्ये दाखल

Published on

शस्त्रसाठा चोरीची माहिती पोलिसांना मिळेपर्यंत आरोपी तेलंगणमध्ये
मुंबई, ता. ११ : दक्षिण मुंबईतील नौदल वसाहतीतून शस्त्रसाठा चोरी झाल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळेपर्यंत आरोपींनी तेलंगण गाठले होते, अशी माहिती पुढे येत आहे.
शनिवारी (ता. ६) रात्री ही चोरी घडली होती. आरोपी राकेश डुब्बला (२२), उमेश डुब्बला (२५) यांनी कफ परेड येथून प्रथम सीएसएमटी गाठले. लोकलने कल्याण तेथून पुणे, पुण्याहून वाडी जंक्शन आणि तेथून सिकंदराबाद असा प्रवास केला. त्यानंतर रिक्षा, टॅक्सीने तर मोठे अंतर ट्रेनने पार करून दोघे आसिफाबाद जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचले. आरोपींचे गाव जंगलात असून शस्त्रसाठा कोणाच्या हाती लागू नये, या विचाराने त्यांनी तो जंगलात दडवून ठेवला, अशी माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
ट्रेनमधील प्रवास आरोपी राकेश याने नौदलाचा गणवेश परिधान करून केला होता. त्यामुळे त्याच्याकडे असलेल्या शस्त्रसाठ्याबाबत रेल्वेस्थानकातील पोलिस, नागरिकांना संशय आला नाही, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, चोरीनंतर नौदलाने आपल्या पद्धतीने तपास सुरू केला. आरोपी गणवेशात आल्याने नौदलाने आधी तळावर नियुक्त जवानांची हजेरी घेतली. कोण गैरहजर, बेपत्ता आहे का, याची खातरजमा केली; मात्र चोरी करणाऱ्या व्यक्ती बाहेरगावातील असल्याचे लक्षात येताच नौदलाने सोमवारी (ता. ८) तक्रार दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला.

नक्षली संबंधाबाबत दाट संशय
आरोपींचे गाव आणि जिल्हा नक्षलप्रवण आहे. आरोपी राहत असलेल्या गावात सतत नक्षली हालचाली सुरू असतात. काही दिवसांपूर्वी गावातील पोलिस चौकीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. तर काही सक्रिय नक्षलवाद्यांनी अलीकडेच पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. या पार्श्वभूमीवर आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध असावेत, असा दाट संशय गुन्हे शाखेकडून वर्तविण्यात येत आहे.

आरोपी, तक्रारदार ओळखीचे
आरोपी अग्निवीर राकेश आणि तक्रारदार आलोक सिंग एकमेकांना आधीपासून ओळखत होते. हे दोघे एकाच वेळी, एकाच तुकडीतून अग्निवीर म्हणून नौदलात नियुक्त झाले, अशी माहिती पुढे आल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com