एलफिस्टन पुल पाडकाम
पादचारी पुलाने संसार रस्त्यावर!
प्रभादेवीतील सुंदरनगर रहिवाशांना पुनर्वसनाची प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : एल्फिन्स्टन पूल पाडकामाच्या पार्श्वभूमीवर चर्चगेटच्या दिशेला पादचारी पूल बांधण्यात येत आहे. त्यासाठी सेंट्रल रेल्वे कॉलनी सुंदर नगर येथे एकूण १८ झोपडपट्ट्या हटविण्यात आल्या. पादचारी पूलाचे काम अंतिम टप्यात आहे; मात्र अद्यापही रहिवाशांचे पुनर्वसन रखडल्याने रहिवाशांनी संसार रस्त्यावर मांडला आहे.
परळ येथील सेंट्रल रेल्वे कॉलनीजवळच्या सुंदर नगर चाळीतील रहिवासी सुमारे ५० ते ६० वर्षांपासून राहात आहेत. या ठिकाणी १८ झोपड्या होत्या. २५ जून, २०२४ रोजी परळ रेल्वे प्रशासनामार्फत झोपड्या हटवण्यात आल्या. त्यातील केवळ आठ रहिवाशांना अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले; परंतु १० कुटुंबीयांचे अद्याप पुनर्वसन झाले नसल्याने ते रस्त्यालगत ताडपत्री बांधून राहत आहेत. त्यांनाही रेल्वे प्रशासनामार्फत वारंवार हटविण्यात येते. मुलांच्या ऐन परीक्षेच्या काळात त्यांच्यावर कारवाई केली जाणार होती; परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निवेदन दिले. त्यांनी रहिवाशांचे पुर्नवसन होईपर्यंत कारवाई करू नका, अशा सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्याचे रहिवाशांनी सांगितले. तसेच अनेकांचे परळ सिग्नलजवळ लहान मोठे व्यवसाय आहेत. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. एकीकडे बेघर झाले असताना आम्हाला व्यवसायही करू दिला जात नसल्याची उद्विग्नता येथील रहिवाशांनी व्यक्त केली.
===
पाण्यासाठी पायपीट
परळ रेल्वेप्रशासनाने २५ जून २०२४ रोजी या झोपड्या तोडण्यात आल्या. त्यामुळे रहिवासी रस्त्यावर राहत आहेत. त्यांना जवळपासच्या इमारती किंवा चाळीतून पिण्यासाठी दोन हंडे पाणी प्रत्येक कुटूंबाला आणावे लागत आहे. वापरण्याच्या पाण्यासाठी आठवड्यातून एकदा सर्व मिळून पैसे काढतात आणि एक हजार रुपयांचा टँकर घेतात.
----
प्रशासनाने दखल घ्यावी!
१९८५ पासून आम्ही येथे राहत आहोत. रेल्वेने घरे तोडल्याने ताडपत्रीत राहत आहोत. झोपड्या तोडल्या, तरी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे पावसाळ्यात हाल होतात. मुले शाळेत आहेत, त्यांनाही अभ्यास करण्यास अडचण येते. त्याची प्रशासनाने दखल घ्यायला हवी, अशी विनंती स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.