नशीबात असेल तरच म्हाडाचे घर मिळणार!

नशीबात असेल तरच म्हाडाचे घर मिळणार!

Published on

नशिबात असेल तरच म्हाडाचे घर मिळणार!
कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी एक लाख ८४ हजार ९९४ अर्ज; अनामत रकमेपोटी १५२ कोटी ७१ लाख रुपये जमा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : म्हाडाच्या कोकण मंडळाने सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाच हजार ३६२ घरांची लॉटरी काढली आहे, मात्र यंदा नशिबात असेल, तरच म्हाडाच्या घराची लॉटरी लागणार आहे. कोकण मंडळाच्या घरासाठी प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, तब्बल एक लाख ८४ हजार ९९४ अर्ज आले आहेत. तसेच नवी मुंबईत २० टक्के सर्वसमावेशक योजनेत ५५६ घरे असून, त्यासाठी एक लाख ७० हजार १३५ म्हणजे एका घरासाठी ३०१ अर्ज आले आहेत. त्यामुळे म्हाडाच्या घरासाठी मोठी स्पर्धा होणार असल्याने कोणाला घर लागणार, याकडे लक्ष लागले आहे.
कोकण मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५,२८५ सदनिका आणि ७७ भूखंडांच्या विक्रीकरिता जुलै महिन्यात लॉटरी जाहीर केली होती. त्यानुसार १४ जुलैपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती, तर १२ सप्टेंबरअखेर अर्ज भरण्याची मुदत होती, तर अनामत रक्कम आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे भरण्यासाठी आज रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. दरम्यान, सदर लॉटरीसाठी एकूण एक लाख ८४ हजारहून अधिक अर्ज आले असून, त्यापैकी एक लाख ५८ हजार ४२४ जणांनी अनामत रक्कम भरून आपला अर्ज अंतिम केला आहे. याची ९ ऑक्टोबर रोजी ठाणे येथे डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात संगणकीय लॉटरी काढली जाईल.

येथील घरांना सर्वाधिक अर्ज
ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, विरार, टिटवाळा आशा ठिकाणी खासगी विकसकांकडून म्हाडाला २० टक्के योजनेअंतर्गत ५६५ घरे मिळाली असून, त्याच्यासाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत.

कोणत्या योजनेत किती घरे, किती अर्ज
योजना - घरे - अर्ज
- सर्वसमावेशक २० टक्के योजना - ५६५ - १,७०,१३५
- सर्वसमावेशक १५ टक्के योजना - ३,००२ - ५,९५३
- म्हाडाने बांधलेली घरे - १,६७७ - ६,३४६
- ५० टक्के परवडणारी घरे योजना - ४२ - १,७०४
- म्हाडा भूखंड - ७७ - ८५६


- एकूण घरे - ५,३६२
- लॉटरीसाठी आलेले एकूण अर्ज - १,८४,९९४
- अनामत रक्कम भरलेले अर्ज - १,५८,४२४
- जमा झालेली अनामत रक्कम - १५२ कोटी ७२ लाख ७२ हजार ८९० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com