उड्डाणपूल प्रकल्प वेळेत पूर्ण करा

उड्डाणपूल प्रकल्प वेळेत पूर्ण करा

Published on

उड्डाणपूल प्रकल्प वेळेत पूर्ण करा
अभिजित बांगर यांची स्पष्ट ताकीद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईतील उड्डाणपुलांच्या बांधकाम व पुनर्बांधणीच्या कामांना गती देऊन नियोजित मुदतीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी दिले आहेत. महापालिका मुख्यालयात मंगळवारी (ता. १६) झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही ताकीद दिली. या बैठकीस पोलिस सहआयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे, महापालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते तसेच रेल्वे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेच्या नियोजनानुसार, अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पूल, पी. डि’मेलो मार्गाला जोडणारा सिंदूर पूल आणि विक्रोळी पूल ही कामे पावसाळ्यापूर्वीच वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहेत. विशेषतः गोखले पूल व सिंदूर पूल अनेक अडचणी पार करून नियोजित वेळेत पूर्ण करण्यात आले. सध्या सुरू असलेल्या महत्त्वाच्या कामांमध्ये शीव (सायन) उड्डाणपूल, बेलासिस उड्डाणपूल (मुंबई सेंट्रल-नागपाडा), विद्याविहार उड्डाणपूल आणि महालक्ष्मी ‘केबल स्टेड पूल’ या पुलांचा समावेश आहे. अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले, की उड्डाणपुलांची कामे वेळेत पूर्ण करणे ही मुंबईच्या वाहतुकीसाठी अत्यावश्यक गरज आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन, वाहतूक पोलिस आणि महापालिका यांनी एकत्रित समन्वय साधून कोणताही विलंब होऊ देऊ नये.
...
सुरू असलेली महत्त्वाची कामे
- शीव (सायन) उड्डाणपूल : हा पूल ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुलाच्या दक्षिण बाजूचा पादचारी पूल ऑक्टोबर २०२५पर्यंत पूर्ण करण्याची हमी रेल्वे प्रशासनाने दिली आहे. पादचारी पूल पूर्ण झाल्यानंतरच मुख्य पूल पाडून पुढील काम सुरू होणार आहे.
- बेलासिस उड्डाणपूल (मुंबई सेंट्रल-नागपाडा) : या पुलाचे काम जलदगतीने सुरू असून, ३६ मीटर लांबीचे १२ गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. डेक शीट, स्लॅब कास्टिंग आणि गार्डर मजबुतीकरणाचे काम सध्या सुरू आहे. नियोजित कालावधी मे २०२६ असला तरी महापालिकेचा प्रयत्न डिसेंबर २०२५पर्यंत पूल पूर्ण करण्याचा आहे.
- विद्याविहार उड्डाणपूल : पूर्वेकडील कामे ३१ डिसेंबर २०२५पर्यंत पूर्ण होणार आहेत. पश्चिमेकडील काम प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनावर अवलंबून आहे. मे २०२६ अखेर हा पूल पूर्ण होईल.
- महालक्ष्मी ‘केबल स्टेड पूल’ : मुंबईतील पहिला ‘केबलआधारित’ पूल म्हणून हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. ७० मीटर उंच पायलॉनचे काम प्रगतिपथावर आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत पश्चिमेकडील ९० मीटरचा स्पॅन पूर्ण होईल, तर १६० मीटरचा पूर्वेकडील स्पॅन जानेवारी २०२६ पासून सुरू होऊन सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहील. संपूर्ण पूल व त्याची पोहोच रस्ते नोव्हेंबर २०२६पर्यंत पूर्ण होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com