वस्त्रोद्योगाला आता सौर ऊर्जेची ''पॉवर''

वस्त्रोद्योगाला आता सौर ऊर्जेची ''पॉवर''

Published on

वस्त्रोद्योगाला आता सौरऊर्जेची ‘शक्ती’!
प्रकल्प उभारण्याचे नियोजन; अनुदानाचा बोजा हलका होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला सौरऊर्जेची वीज देण्याची मोहीम जोरात सुरू असताना, आता वस्त्रोद्योगालाही सौरऊर्जा पुरवण्याचे सरकारचे नियोजन आहे. राज्यात विखुरलेल्या वस्त्रोद्योगासाठी सौरऊर्जेसाठी कुठे सौर प्रकल्प उभारावे लागतील, याबाबतचा आराखडा तयार केला जाणार आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगासाठीही सौरऊर्जेचा वापर सुरू झाल्यास वीजदर सवलतीच्या अनुदानाचा भार कमी होऊ शकणार आहे.
राज्यात पाच-सहा लाख वस्त्रोद्योग असून, त्यांना महावितरणकडून सवलतीच्या दरात वीजपुरवठा केला जातो. त्यांच्या वीजबिलाच्या शेकडो कोटींच्या सवलतीचा भार अनुदान रूपाने राज्याच्या तिजोरीवर पडतो. शेतकऱ्यांच्या वीजबिल सवलतीचा भार सरकारवर पडत असल्याने त्यांनी सौरऊर्जा प्रकल्पात स्वस्तात तयार होणारी वीज, सौरकृषी पंपाचे पर्याय उपलब्ध केल्याने हा भार टप्प्याटप्प्याने कमी होत आहे. त्याच धर्तीवर वस्त्रोद्योग सौरऊर्जेवर चालवण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता सरकारने अप्पर मुख्य सचिव (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यांची समिती नेमली आहे.
---
ठिकठिकाणी प्रकल्प उभारणार
वस्त्रोद्योगाच्या ठिकाणी सौरऊर्जा संयंत्र स्थापन करण्यासाठी जमीन उपलब्ध नसल्यास संबंधित वस्त्रोद्योग घटकांनी अन्यत्र ठिकठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प स्थापन करून तेथील वीज वापरण्यास परवानगी देण्याचा विचार आहे. तसेच वस्त्रोद्योगासाठी सौरऊर्जेची निर्मिती करताना सौरऊर्जेची साठवणूक बॅटरीमध्ये करता येईल का, याबाबत अभ्यास केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com