मुंबईत मलेरिया-चिकुनगुनियाचा उद्रेक

मुंबईत मलेरिया-चिकुनगुनियाचा उद्रेक

Published on

मुंबईत मलेरिया-चिकुनगुनियाचा उद्रेक
डासांची संख्या नियंत्रणाबाहेर; दररोज ६९ रुग्णांना आजाराचा विळखा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईत पावसाळी आजारांचे प्रमाण वाढले असून, मलेरिया-चिकुनगुनियाचा उद्रेक झाला आहे. शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, दररोज किमान ६९ रुग्णांना या आजाराची लागण होत आहे. मागील १५ दिवसांत एक हजाराहून अधिक रुग्णांना संसर्गजन्य कीटकांचा त्रास झाला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने जानेवारी ते १५ सप्टेंबर या कालावधीतील पावसाळी आजारांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार या कालावधीत मलेरियाचे सहा हजार २७७, तर चिकुनगुनियाचे ५४२ रुग्ण आढळले आहेत. डेंगी आणि लेप्टोस्पायरोसिससह इतर आजारांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचेही अहवालात नमूद केले आहे.
----
विविध आजारांची रुग्णसंख्या (जानेवारी-सप्टेंबर २०२५)
आजार रुग्णसंख्या
मलेरिया ६२७७
डेंगी २७२४
चिकुनगुनिया ५४२
गॅस्ट्रो ५९८९
हिपॅटायटीस ९१३
कोविड १११६
----
आजार रुग्णसंख्या (जानेवारी-सप्टेंबर २०२४)
मलेरिया ५१८२
डेंगी ३४३५
चिकुनगुनिया ३६६
लेप्टो ६२८
गॅस्ट्रो ६५९९
हिपॅटायटीस ७९१
कोविड १८३७
----
महापालिकेची उपाययोजना
४.७४ लाख
एकूण घरांचे सर्वेक्षण
----
२२.७३ लाख
नागरिकांची तपासणी
----
८३,२२८
रक्ताचे नमुने
----
३४
आरोग्य शिबिरे
----
२,७८९
कार्यालयांची तपासणी
----
४४,६२५
नागरिकांना लेप्टोची औषधे
---
डास नियंत्रणासाठी प्रयत्न
मलेरिया नियंत्रणासाठी महापालिकेने २५,३६३ प्रजनन स्थळांची तपासणी केली. त्यापैकी १,६७८ ठिकाणी अ‍ॅनोफिलिस डास, तर ११,०५५ एडिस डास नष्ट करण्यात आले. शहराच्या विविध भागातून २६,९१३ टायर आणि कचरा काढून टाकण्यात आला. १९,३५४ इमारती आणि ३,१४,८३० झोपडपट्ट्यांमध्ये धुराचे फॉगिंग करण्यात आले.
---
नागरिकांना आवाहन
नागरिकांना घरात किंवा आजूबाजूला पाणी साचू देऊ नये. कचरा, जुने टायर आणि प्लॅस्टिकचे डबे काढून टाकावेत. डास प्रतिबंधक औषधे आणि डासांच्या जाळ्या वापराव्यात. आजाराची लक्षणे आढळल्यास लगेच नजीकच्या रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com