मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना

Published on

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना
शिवसेना आक्रमक; उद्धव-राज घटनास्थळी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : शिवाजी पार्क मैदानातील मीनाताई (माँसाहेब) ठाकरे यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी विटंबना केली. माँसाहेबांचा अवमान झाल्याने शिवसैनिक संतापाने पेटून उठले आहेत. आधीच निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले असताना या घटनेमुळे मुंबईत तणाव निर्माण झाला असून, कायदा व सुव्यवस्थेचे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
पुतळा विटंबनेची माहिती मिळतात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या वेळी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कोणीतरी महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करीत असून, त्यानेच हे कृत्य केल्याचे उद्धव ठाकरे संतापाने म्हणाले. राज ठाकरे यांनीही या घटनेची माहिती घेतली. मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी सर्व माहिती घेऊन राज ठाकरेंना कळविली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली. विटंबनेची माहिती मिळताच शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवाजी पार्क परिसरात जमा झाले. ‘माँसाहेबांचा अपमान सहन करणार नाही’, ‘ठाकरे घराण्याचा अवमान करणाऱ्यांना सोडणार नाही,’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. काही ठिकाणी शिवसैनिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे, ‘माँसाहेब आमच्या श्रद्धास्थान आहेत. आरोपींना तातडीने अटक झाली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू. ही शिवसैनिकांच्या भावनांचा अवमान करणारी घटना आहे.’
...
मोठ्या संख्येने पोलिस तैनात
घटनेनंतर शिवाजी पार्क परिसरात मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ‘आरोपींना शोधून कठोर कारवाई केली जाईल,’ असे आश्वासन दिले आहे. मुंबईसह राज्यात निवडणूक वातावरण तापलेले असताना ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. येत्या काही दिवसांत हा मुद्दा राजकीय रंग घेऊन मोठा वादंग निर्माण करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
...
भीम आर्मीही आक्रमक
भीम आर्मीनेही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी निवेदनाद्वारे म्हटले, ‘केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि संविधानाच्या शिल्पांची विटंबना झाली. आता माँसाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचा अवमान झाला आहे. ही गंभीर घटना आहे. आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई व्हावी, त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी.’
...
शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
शिवाजी पार्क येथील दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या गुन्ह्याच्या तपासासाठी शिवाजी पार्क पोलिसांसह परिमंडळ ५मधील निवडक अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात आली असून, गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरू केल्याचे सांगण्यात आले. ही कृती चुकून घडली की हेतुपुरस्सर करण्यात आली, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहितेतील २९८ कलमानुसार गुन्हा नोंद झाला आहे. या कलमान्वये गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीस दोन वर्षांची कारावासाची शिक्षा होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com