‘सोलर मॅन’ प्रो. चेतन सोलंकी यांचा राजीनामा
‘सोलर मॅन’ प्रो. चेतन सोलंकी यांचा राजीनामा
मुंबई, ता. १७ : भारताचे ‘सोलर मॅन’ आणि ‘सोलर गांधी’ म्हणून सुप्रसिद्ध सौरऊर्जा शास्त्रज्ञ प्रो. चेतनसिंग सोलंकी यांनी आज आयआयटी मुंबईतील प्रोफेसरपदाचा राजीनामा दिला. ठरवलेले उद्दिष्ट आणि विषयांमध्ये काम करण्यासाठी राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रो. सोलंकी यांनी २०२० मध्ये सुरू केलेली ‘एनर्जी स्वराज यात्रा’ ११ वर्षे चालणार असून, त्यात त्यांनी सौरबसला आपले घर बनवले आहे. आतापर्यंत त्यांनी ६८ हजार किमीचा प्रवास केला असून, १,६५०हून अधिक ठिकाणी हवामान बदलावर व्याख्याने दिली आहेत. हवामान बदल आणि सौरऊर्जेबाबत त्यांनी मोठे योगदान दिले आहे. प्रो. सालंकी यांनी येत्या काळात ‘फायनाइट अर्थ मूव्हमेंट’अंतर्गत (एफईएम) पुढील तीन वर्षांत एक अब्ज लोकांना हवामान कृतीत सहभागी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.