दादरमध्ये परिसरात फेरीवाल्यांमुळे कोंडी
दादर परिसरात फेरीवाल्यांमुळे कोंडी
एल्फिन्स्टन पूल बंद; तक्रारीनंतरही ढिम्म
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : एल्फिन्स्टन पूल शुक्रवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. यामुळे या पुलावरील वाहतूक चिंचपोकळी, करी रोड आणि टिळक पूल मार्गे वळविण्यात आली आहे. दादर रेल्वेस्थानक आणि महत्त्वाच्या रस्त्यांवरील फुटपाथ फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. टिळक पुलावरील वाहतूक कोंडीत दादर परिसरातील या फेरीवाल्यांमुळे आणखी भर पडत आहे.
रस्त्यावरदेखील फेरीवाले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होते. न्यायालयाने रेल्वेस्थानकापासून १५० मीटर अंतरात व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई केली आहे; मात्र दादरमधील सेनापती बापट मार्ग, डिसिल्व्हा मार्ग, रानडे मार्ग, एन. सी. केळकर मार्ग, छबिलदास मार्गावरही फेरीवाल्यांनी पथाऱ्या पसरल्या आहेत.
===
दादर टर्मिनसकडील वाहतुकीत बदल
- टिळक ब्रिजवरून दादर टर्मिनसकडे जाणाऱ्या वाहनांकरिता वाहतूक व्यवस्थेमध्ये १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७:०० वाजल्यापासून ते रात्री ११ पर्यंत बदल केला आहे.
- दादर पश्चिमेकडून व दादर पूर्वेकडून येणारी वाहने कोतवाल गार्डन वनमाळी चौक टिळक ब्रिज रॅम्प आणि पुढे दादर टर्मिनसकडे जाऊ शकतात.
- दादर टर्मिनसकडून बाहेर जाणारी वाहने रेल्वे फलाट क्रमांक ७ गेटमधून माटुंगा रोडने कमला रामणनगर वसाहत रेल्वे कर्मचारी वसाहत गेट (कॅनरा बॅक) कटारिया मार्गाने डावे वळण घेऊन माहीम किंवा सायनकडे वा इच्छित स्थळी जाण्यासाठी वापर करू शकतील. विहित वेळेपूर्वी ती टिळक पुलाकडे येणार नाहीत.
===
दादर पश्चिम परिसरात मोठ्या प्रमाणात फेरीवाले आहेत. काही लोक तर रस्त्यावर बसून मालाची विक्री करतात. दादर मध्यवर्ती ठिकाण असल्याने ग्राहकांची संख्याही जास्त असते. त्यामुळे रानडे रोड व इतर ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होतेच; पण पादचाऱ्यांना फुटपाथ उपलब्ध नसल्याने रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघाताचा धोका आहे.
- डॉ. शंकर विश्वनाथ, वाहतूकतज्ज्ञ
===
आवश्यक असेल तरच टिळक पूल वापरा
दादर परिसरात रानडे रोड, भवानी शंकर रोड केळकर रोड येथे फेरीवाल्यांमुळे वाहतुकीला फटका बसतो. कित्येक वेळा फेरीवाले फुटपाथसह रस्त्यावरही बसतात. त्यामुळे ग्राहकांची गर्दी होते, वाहतुकीचा वेग कमी होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी हे फेरीवाले हटवणे आवश्यक आहेत. तसेच टिळक पूल अरुंद असल्याने आवश्यक असेल तरच टिळक पूल वापरावा असे नागरिकांना आवाहन आहे.
- कन्हैयालाल शिंदे, पोलिस निरीक्षक, दादर वाहतूक विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.