मुंबईत रस्त्यावर टाकलेली वाहने महापालिकेने हटवली
मुंबईत रस्त्यावर टाकलेली वाहने महापालिकेने हटवली
१,०५० वाहनांची विल्हेवाट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : शहरातील रस्त्यांवर दीर्घकाळापासून सोडून दिलेली वाहने हटवण्यासाठी महापालिकेने मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत तब्बल १,०५० वाहनांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. यामध्ये २६२ चारचाकी, ६२९ दुचाकी आणि १७२ तीनचाकी वाहनांचा समावेश आहे.
पालिकेच्या माहितीनुसार, ठेकेदारांनी आतापर्यंत शहरभरात सुमारे ६,२०० सोडून दिलेली वाहने शोधली आहेत. रस्त्यावर सोडून दिलेली वाहने वाहतूक कोंडी वाढवतात, पादचाऱ्यांचा मार्ग अडवतात तसेच रस्ते स्वच्छतेच्या कामातही अडथळा निर्माण करतात, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेने शहर विभाग, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर या तीन भागांसाठी स्वतंत्र ठेकेदार नेमले आहेत. हे ठेकेदार रस्त्यावरील वाहने ओळखून त्यांची विल्हेवाट लावतात. वाहनावर प्रथम नोटीस चिकटवली जाते. ७२ तासांच्या आत वाहनधारकाने प्रतिसाद दिला नाही, तर ते वाहन जप्त करून स्क्रॅपयार्डमध्ये नेले जाते आणि नंतर लिलाव करण्यात येतो. वाहन जप्त झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत मालकाने दंड भरून वाहन परत घेण्याची संधी असते. हलक्या मोटार वाहनांसाठी दंडाची कमाल रक्कम १५,१०० तर दुचाकींसाठी ८,३०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर वाहनधारक कोणताही दावा करू शकत नाही.
पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, बहुतांश टाकाऊ वाहनांत महत्त्वाचे सुटे भाग आधीच चोरीला गेलेले असतात, त्यामुळे ठेकेदारांना केवळ किमान स्क्रॅप व्हॅल्यू मिळते, मात्र त्यांनी महापालिकेला ठरावीक रक्कम भरणे आवश्यक असते, ती रक्कम वाहनांच्या लिलावातून वसूल केली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.