‘नमो युवा रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘नमो युवा रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on

‘नमो युवा रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्यमंत्री फडणवीस यांनीही घेतला सहभाग

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो), मुंबईच्या वतीने रविवारी (ता. २१) ‘नमो युवा रन’चे भव्य आयोजन करण्यात आले. सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने ‘नशामुक्त भारत’ अभियानाला समर्पित ही पाच किमी लांबीची मॅरेथॉन वरळी येथील कोस्टल रोड प्रोमेनेडवर पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून स्वतःदेखील धाव घेत स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

‘नमो युवा रन’मध्ये सात हजारपेक्षा अधिक युवक, विद्यार्थी, नागरिकांनी सहभाग घेतला. उत्साही वातावरणात सहभागी धावपटूंनी ‘नशामुक्त मुंबई’चा संकल्प करत पंतप्रधान मोदींच्या नशामुक्त भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी पाऊल टाकले. सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या या मॅरेथॉनने कोस्टल रोड प्रोमेनेड ऊर्जा, उत्साह आणि राष्ट्रीय चेतनेने भारून गेला. याप्रसंगी भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार तेजस्वी सूर्या, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, अभिनेते अशोक सराफ, मिलिंद सोमन आणि अभिनेत्री नायरा बनर्जी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १० लाख
‘नमो युवा रन’च्या माध्यमातून भाजयुमो मुंबईने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १० लाख रुपयांचे योगदान दिले. ही स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली. पुरुष व महिला गटांतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान, ‘ही केवळ स्पर्धा नसून, नशाविरोधात मुंबईच्या युवांचा प्रखर उद्घोष आहे. नमो युवा रनद्वारे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रेरित व संघटित युवाशक्तीची भेट अर्पण करत आहोत,’ असे भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com