जोखमीच्या पुलाच्या तपासणीचे काम आयआयटीला

जोखमीच्या पुलाच्या तपासणीचे काम आयआयटीला

Published on

जोखमीच्या पुलाच्या तपासणीचे काम आयआयटीला
निविदा प्रक्रिया न राबवता थेट सोपवली जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : ‘आर, उत्तर’ विभागातील एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया पश्चिम विभागाच्या कार्यालयाजवळ, पश्चिम द्रुतगती महामार्गालगत एस. व्ही. रोड व सी. एस. लिंक रोडला जोडणाऱ्या वाहतूक पुलाचे निष्कासन आणि पुनर्बांधणीचे काम सुरू होण्यापूर्वी त्याची संरचनात्मक तपासणी आयआयटी मुंबईमार्फत करण्यात येणार आहे. महापालिकेने या कामासाठी निविदा प्रक्रिया न राबवता थेट आयआयटी मुंबईला काम सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.

विमानतळाजवळील एस. व्ही. रोड व सी. एस. लिंक रोड पुलाची संरचनात्मक तपासणी आयआयटी मुंबईकडे सोपवण्यात आली असून, प्राध्यापक सौविक बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली हे परीक्षण करण्यात येणार आहे. आयआयटीला यासाठी तीन लाख रुपये मानधन दिले जाणार आहे. संबंधित शुल्क रास्त व वाजवी असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिका अधिनियम १८८८ नुसार, तीन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या कोणत्याही कामासाठी ई-निविदा प्रक्रिया बंधनकारक असते, परंतु आयआयटी मुंबई ही राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्था असून, या विशेष तांत्रिक कामासाठी आवश्यक कौशल्य त्यांच्या ठिकाणी उपलब्ध असल्याने निविदा मागवून दुसऱ्या कुणाकडून काम करवून घेण्यात उपयोग नाही. त्यामुळे निविदा प्रक्रिया शिथिल करण्याचा प्रस्ताव प्रशासकांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

महापालिकेवर पाच प्रशासक असल्याने स्थायी समितीऐवजी प्रशासकांची मंजुरी घेण्यात येईल. मुंबई महापालिका अधिनियमातील नव्या सुधारणा लक्षात घेता, महापालिकेच्या सर्व निर्णयांवरील अधिकार सध्या प्रशासकांकडे निहित आहेत. त्यामुळे या प्रस्तावाला प्रशासकांची मंजुरी मिळाल्यानंतरच पुलाच्या तपासणीसाठी आयआयटी मुंबईला औपचारिक मान्यता दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com