नोकरदारांसह विद्यार्थ्यांची गैरसोय

नोकरदारांसह विद्यार्थ्यांची गैरसोय

Published on

नोकरदारांसह विद्यार्थ्यांची गैरसोय
शिवडी-परळकरांना ‘एल्फिन्स्टन’चा फटका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : एल्फिन्स्टन पुलाअभावी या मार्गे जाणाऱ्या बेस्ट बसगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. परिणामी, शिवडी ते परळ परिसरातील विद्यार्थी आणि नोकरदारवर्गाची मोठी गैरसोय सुरू झाली आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेले काही महत्त्वाचे बसमार्ग परळपर्यंतच मर्यादित झाल्याने शिवडीहून दादर, परळ, सांताक्रूझसारख्या ठिकाणी पोहोचणे कठीण बनले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी आमदार आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे, की २०१ क्रमांकाच्या बसमुळे शारदाश्रम व अँटोनिया डिसिल्वा शाळेत जाणाऱ्या मुलांची मोठी सोय होत होती; मात्र पुलाचे तोडकाम सुरू झाल्यापासून ही बस शिवडीऐवजी परळ एसटी डेपो येथेच थांबवली जात आहे. त्यामुळे परळ-शिवडीतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक रोजच्या प्रवासासाठी त्रास सहन करीत आहेत. २०१ सोबतच १६२ क्रमांकाच्या बसमार्गातही बदल करण्यात आला आहे. ही बस आता करी रोड पुलावरून न नेता चिंचपोकळी पुलावरून सोडण्यात येत असल्याने प्रवासाचा वेळ दुपटीने वाढला आहे. शिवडी व परळ विभागातील नोकरदार प्रवाशांची या बदलामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. स्थानिक नागरिक व पालकांनी या समस्येकडे आमदार आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे. ‘बस मार्ग परळपुरता मर्यादित न ठेवता पूर्ववत शिवडीपर्यंत सुरू करावेत. तसेच १६२ बसही पुन्हा करी रोड पुलावरूनच सोडण्यात यावी. यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांची सोय होईल,’ अशी मागणी सचिन पडवळ यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
...
सोय नव्हे, तर गरज!
एल्फिन्स्टन पुलाच्या तोडकामामुळे बसमार्ग बदलले गेल्याने शिवडी-परळ परिसरातील विद्यार्थी व नोकरदार रोज त्रास सहन करीत आहेत. २०१ व १६२ या बसगाड्या पूर्ववत शिवडीपर्यंत सुरू केल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. ही केवळ सोय नव्हे, तर गरजेची बाब आहे, असे सचिन पडवळ यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com