अंतर योग फाउंडेशनतर्फे सामूहिक महालय श्राद्ध

अंतर योग फाउंडेशनतर्फे सामूहिक महालय श्राद्ध

Published on

अंतर योग फाउंडेशनतर्फे सामूहिक महालय श्राद्ध
मुंबई, ता. २२ : सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी अंतर योग फाउंडेशनतर्फे फोर्ट येथे असलेल्या अंतर योग गुरुकुलमध्ये ऐतिहासिक व दिव्य सामूहिक महालय श्राद्ध पार पडले.
या सोहळ्यात २०० हून अधिक भक्त सहभागी झाले होते. अंतर योग फाउंडेशनचे संस्थापक आचार्य उपेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. भारताच्या आध्यात्मिक इतिहासात एक नवा अध्याय रचत प्रथमच १२० महिलांनी आणि १०० पुरुषांनी एकत्रितपणे श्राद्ध विधी करून पारंपरिक बंधने मोडीत काढली. ६० किलो तांदळापासून ४,२०० पिंडदान अर्पण करण्यात आले. वेदघोष, यज्ञविधी आणि सामूहिक अर्पण यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. हा संपूर्ण विधी शास्त्रोक्त पद्धतीने घेण्यात आला. आचार्य उपेंद्र यांनी विशेष दीड तासाची ‘पितृ ऋण मुक्ति साधना’ घडवून आणली. दरम्यान, ‘सामूहिक महालय श्राद्ध हा केवळ एक विधी नाही, तर आपल्या पितरांप्रति कृतज्ञतेचा दिव्य भाव आहे. हा ऐतिहासिक सोहळा प्राचीन परंपरांचे पुनरुज्जीवन करतो तसेच महिलांना या पवित्र कर्मकांडांमध्ये समान सहभागाचा अधिकार प्रदान करतो,’ अशी माहिती अंतर योग फाउंडेशनचे आचार्य उपेंद्र यांनी दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com