लोकनाट्य व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याचा प्रस्ताव : ॲड. आशीष शेलार
लोकनाट्य व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याचा प्रस्ताव : ॲड. आशीष शेलार
मुंबई, ता. २२ : ‘लोकनाट्य, तमाशा हे नाव संगीतबारी कला केंद्रासाठी न वापरण्याचे बंधन असावे, या तमाशा कलावंत संघटनेच्या मागणीचा प्रस्ताव यापूर्वी स्थापित झालेल्या समितीकडे पाठविण्यात यावा, या समितीने कला केंद्र व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याबाबतचा निर्णय पुढील १५ दिवसांत द्यावा’ असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी सोमवारी (ता. २२) दिले.
तमाशा कलावंतांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सोमवारी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभिषण चवरे, गृह विभागाचे उपसचिव अ. नि. साखरकर, अवर सचिव बाळासाहेब सावंत, अखिल भारतीय लोककलावंत मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव, सल्लागार खंडुराज गायकवाड, रघुवीर खेडकर, अविष्कार मुळे, किरणकुमार ढवळपुरीकर, शेषराव गोपाळ, आनंद भिसे, सुनील वाडेकर उपस्थित होते. राज्यातील तमाशा आणि कला केंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्यांच्या गठनाचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी यापूर्वीच घेतला आहे. या समितीची कार्यकक्षा वाढवून नावात बदल करण्याबाबत ही समिती उपाययोजना सुचवेल, असे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. त्याचबरोबर, या लोककलावंतांना गावोगावी कला सादर करण्यासाठी विविध परवानग्यांची आवश्यकता असते. यासंदर्भातही या नियुक्त समितीने उपाययोजना सुचवून पुढील १५ दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.