‘एसटी ॲप’चे प्रवासी दहा लाखांच्या पार
‘एसटी ॲप’ला प्रवाशांची पसंती
सुमारे १० लाख जणांकडून वापर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) मोबाईल ॲपला अलीकडे प्रवाशांकडून वाढती पसंती मिळत असून, सध्या या ॲपचे सुमारे १० लाख वापरकर्ते आहेत. परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, की एसटी महामंडळाने मोबाईल ॲप काही महिन्यांपूर्वी सुधारणा करून नवीन आवृत्तीमध्ये सुरू केले आहे. त्याचा मुख्य हेतू प्रवाशांना बसची आरक्षण सेवा अधिक सुलभ पद्धतीने उपलब्ध करणे असा आहे. पारंपरिक तिकीट खरेदी व थेट बस स्थानकावर अवलंबून राहण्याऐवजी प्रवासी आता त्यांच्या स्मार्टफोनवरून तिकीट खरेदी करू शकतात, प्रवासाची माहिती तपासू शकतात. १ एप्रिल २०२५ पासून सुरू केलेल्या नवीन ॲपला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, मार्च २०२५मध्ये तीन लाख ९४ हजार प्रवासी जुन्या मोबाईल ॲपचा वापर करीत होते. सुधारित ॲप आल्यानंतर मे २०२५मध्ये सुमारे सहा लाख ७२ हजार प्रवाशांनी नवीन मोबाईल ॲपचा वापर केला आहे. सध्या १० लाख वापरकर्त्यांपैकी सरासरी दरमहा पाच लाख प्रवासी सुधारित मोबाईल ॲपवरून तिकीट काढत आहेत. ॲप डाऊनलोड करणाऱ्या प्रवाशांनी आपला अनुभव, ॲपबद्दलच्या सूचना, तक्रारी याबाबतीत भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अर्थात एक लाख २५ हजार वापरकर्त्यांच्या तक्रारी व सूचना यासंदर्भात काही आव्हाने आहेत. नेटवर्क कव्हरेज कमी असलेल्या ग्रामीण भागात रिअल टाइम माहिती व डिजिटल पेमेंटची सेवा सतत उपलब्ध नसल्याचे तक्रारीत दिसून येते. तसेच ज्येष्ठ नागरिक किंवा तांत्रिकदृष्ट्या कुशल नसलेल्या प्रवाशांसाठी ॲपचा वापर अवघड असल्याच्याही काही प्रतिक्रिया आहेत.
...
ग्रामीण भागातील नेटवर्क समस्या दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने स्थानिक सुविधांचा विचार करून ॲप अधिक सुलभ बनवण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे. एसटीच्या मोबाईल ॲपला प्ले स्टोअर ॲपमध्ये ४.६ स्टारचे रेटिंग मिळाले आहे. तंत्रज्ञानाचा वापर योग्य नियोजन व स्थानिक अडचणींचा विचार करून केल्यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित व पर्यावरणपूरक सेवा मिळण्यास मदत झाली आहे.
- प्रताप सरनाईक, अध्यक्ष, एसटी महामंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.