बेकायदा ॲप-आधारित वाहनांवर कारवाई

बेकायदा ॲप-आधारित वाहनांवर कारवाई

Published on

बेकायदा ॲप-आधारित वाहनांवर कारवाई
२६३ वाहनांकडून ३.८८ लाख रुपयांची दंडवसुली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : बेकायदा ॲप-आधारित वाहनचालकांनी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी परिवहन विभाग आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण यांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये ज्या रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन तसेच प्राधिकरणाने निश्चित केलेल्या अटी व शतींचे उल्लंघन केले आहे, अशा ७,१५२ वाहनांवर कारवाई करुन त्यांच्याकडून एक कोटी साठ लाखांचा दंड वसुल करण्यात आला

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, ‘शासनाच्या निर्णयानुसार ॲप-आधारित वाहने चालविण्यासाठी चालकांकडे वैध परवाना असणे तसेच चालकांना भाड्याच्या रकमेपैकी ८० टक्के भाडे देणे बंधनकारक असून, प्रवाशांकडून ठरविलेल्या दरापेक्षा कमी-जास्त भाडे आकारता येणार नाही.’ मुंबईत अनेक ॲप-आधारित वाहने प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूल करत असल्याच्या तक्रारींनंतर परिवहन विभागाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेष म्हणजे, शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच प्रवाशांकडून भाडे आकारले पाहिजे, परंतु काही चालक विनापरवाना तसेच अतिरिक्त शुल्क आकारत असल्याचे आढळून आले. अशा चालकांवर कारवाईसाठी विविध पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलेले आहेत. राज्यात ॲप-आधारित वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने ‘ॲग्रिगेटर्स पॉलिसी’ लागू केली आहे. यानुसार परवान्याशिवाय ॲप-आधारित सेवा देणाऱ्या कंपन्यांवर व त्यांच्या चालकांवर कारवाई होणार आहे.

नवे दर (पहिल्या टप्प्यासाठी १.५ किमी मीटरप्रमाणे)
रिक्षा २६ रुपये
टॅक्सी ३१ रुपये
ई-बाइक १५ रुपये
त्यानंतरच्या प्रवासासाठी २०.६६ रुपये प्रति किमी तर ई-बाइकसाठी प्रति किमी १०.२७ रुपये भाडे आकारले जाणार आहे.
- एसी वाहनांना १० टक्के अधिक भाडे निश्चित करण्यात आले आहे.


ऑटो-टॅक्सींसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ठरवलेल्या दरांनुसार ऑटो रिक्षासाठी (मीटरप्रमाणे) पहिल्या टप्प्यासाठी (१.५ किमी) २६ रुपये भाडे, काळी-पिवळी टॅक्सी (मीटरप्रमाणे) पहिल्या १.५ किमी साठी ३१ रुपये भाडे यानंतर मीटरनुसार प्रवासाचे दर २०.६६ रुपये प्रति आकारले जातील. एसी वाहनांना १० टक्के अधिक भाडे निश्चित केले आहे.

मुंबईत बेकायदेशीर वाहनचालकांनी तातडीने नियमांचे पालन करावे, अन्यथा त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- भरत कळस्कर, सचिव, मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण

प्रवाशांची फसवणूक रोखण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी शासनाने आखलेल्या धोरणांनुसार ॲप-आधारित रिक्षा, टॅक्सी आणि इतर वाहनांवर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात पावले उचलण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढील काळात आणखी कठोर कारवाई करण्यात येईल.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री


...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com