दररोज ३६८ नागरिकांना कुत्र्याचा चावा
दररोज ३६८ नागरिकांना कुत्र्यांचा चावा
जागतिक रेबीज दिन; जानेवारी ते ऑगस्टदरम्यान ८८ हजार घटनांची नोंद
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः मुंबईत कुत्र्यांची दहशत वाढली असून पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दररोज ३६८ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेण्याचे प्रकार घडले आहेत.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ‘सकाळ’ला दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट ८८,६१२ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद करण्यात आली. यानुसार, २४१ दिवसांत प्रतिदिन ३६८ लोकांना कुत्रा चावल्याची घटना घडली. दरम्यान, आतापर्यंत रेबीज किंवा संबंधित मृत्यूची एकही नोंद पालिकेतर्फे करण्यात आली नसल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. पालिकेने रेबीज नियंत्रण करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत; मात्र तरीही कुत्र्यांचा वावर आणि वाढती संख्या चिंतेचे कारण आहे. त्यातच भटक्या कुत्र्यांचा पादचारी, दुचाकी वाहनाच्या मागे धावत जाऊन त्यांना चावत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. या संदर्भातील माजी नगरसेवक ऊर्मिला पांचाळ यांनी परळच्या स्थानिक प्रशासनाकडे लक्ष वेधले. पांचाळ यांनी सांगितले, की त्यांच्या रहिवासी परिसरातील दोन कुत्री नवीन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर धावून जातात. याठिकाणी शाळेतील मुले रस्त्यावरून चालत असतात. अशा परिस्थितीत कुत्रा चावला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
......
पालिकेच्या नियमानुसार रेबीज प्रकरणाची नोंद जेव्हा विषाणूचे निदान होईल तेव्हाच केली जाते; मात्र शरीरातील विषाणूचे निदान होण्यासाठी शवविच्छेदन हा सर्वोत्तम मार्ग आहे; परंतु रेबीजचा विषाणू इतका संसर्गजन्य आहे की शवविच्छेदन केले जात नाही. दरम्यान, महाराष्ट्रात दरवर्षी हजारो रेबीजमुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.
अनेकदा एक रुग्ण दोन ठिकाणी इंजेक्शन घेण्यासाठी जातो. यामुळे दोन वेळा नोंद होऊ शकते; पण पालिका अनेक उपाययोजना करीत असून महापालिका रुग्णालये आणि अनेक छोट्या-मोठ्या दवाखान्यांमध्ये इंजेक्शन उपलब्ध आहेत. कुत्र्यांचे लसीकरणही केले जात आहे.
- डॉ. दक्षा शाह, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका
.....................................
वर्ष श्वान चावे
२०२३ १,०६,७९७
२०२४ १,३१,४३४
२०२५ ८८,६१२ (ऑगस्ट २०२५पर्यंत)
..........
कुत्र्यांचे लसीकरण
२०२३ १४,९५४
२०२४ १६,८४९
२०२५ १४,३०६ (ऑगस्ट २०२५पर्यंत)
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.