गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासाने बिल्डरशाही संपवून टाका : प्रवीण दरेकर
गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासाने बिल्डरशाही संपवून टाका : प्रवीण दरेकर
मुंबई, ता. २८ : जास्तीत जास्त लोकांनी स्वयंपुनर्विकासात सहभागी होऊन बिल्डरशाही संपवून टाकावी, असे आवाहन भाजप गटनेते तथा महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी गृहनिर्माण संस्थांना केले.
दि मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप. हाउसिंग फेडरेशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. याप्रसंगी मुंबई हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, सेक्रेटरी दत्तात्रय वडेर, खजिनदार ज्ञानेश्वर महाजन, सहकारातील ज्येष्ठ नेते व मुंबई बँकेचे संचालक शिवाजीराव नलावडे, मुंबई हाउसिंग फेडरेशनचे संचालक सुहास भोईटे, सविता झेंडे, विजय पवार, आशीष गोयल, भाई सावंत, विशाल कडणे, अजय बागल, हेमंत दळवी, धनंजय बर्डे, दिलीप गोसावी, मुंबई बँकेच्या संचालिका जयश्री पांचाळ यांसह मोठ्या संख्येने हाउसिंग फेडरेशनचे प्रतिनिधी आणि सभासद उपस्थित होते. या वेळी दरेकर म्हणाले, ‘हाउसिंग फेडरेशनची कामकाजात प्रगती झाली. कारभारही उत्तम पद्धतीने होत आहे. राज्यात असणाऱ्या सहकारी संस्थांत सर्वात जास्त सहकारी संस्था गृहनिर्माण क्षेत्राच्या आहेत. गृहनिर्माण क्षेत्रामधील प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्यानंतर त्यांनी त्यांचे पाठबळ या क्षेत्राला आणि फेडरेशनला दिले आहे. मुंबई जिल्हा बँकेकडे हाउसिंग सोसायट्यांचे १,६०० प्रस्ताव आले असून, ४० ते ४५ संस्थांना कर्ज दिले आहे. जास्तीत जास्त लोकांनी स्वयंपुनर्विकासात यावे आणि बिल्डरशाही संपवून टाकावी.’
तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध करून देऊ!
राज्याच्या सहकार चळवळीला वैभवाचे दिवस आणण्याच्या कामात सिंहाचा वाटा राज्य सहकारी संघाचा होता. या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली आहे. संघाला पुन्हा गतवैभव आणण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलावा, या भावनेतून मी अध्यक्ष झाल्यावर सर्व क्षेत्राचा कृती आराखडा तयार केला आहे. कमतरता भासली तर राज्य सहकारी संघ चांगले तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध करून देऊ, असा विश्वासही दरेकरांनी या वेळी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.