महाराष्ट्र चेंबरच्या हंगामी 
अध्यक्षपदी रवींद्र माणगावे

महाराष्ट्र चेंबरच्या हंगामी अध्यक्षपदी रवींद्र माणगावे

Published on

महाराष्ट्र चेंबरच्या हंगामी
अध्यक्षपदी रवींद्र माणगावे
ललित गांधी यांचा राजीनामा
मुंबई, ता. २९ : वार्षिक सर्वसाधारण सभेत मनमानी आणि संस्था ताब्यात घेण्याच्या प्रयत्नाचा आरोप मागील आठवड्यात गांधी यांच्यावर करण्यात आला होता. त्यावरून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सोमवारी (ता. २९) राजीनामा दिला. त्यामुळे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र माणगावे यांची हंगामी अध्यक्षपदी निवड झाली.
मागील आठवड्यात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माणगावे यांनी ललित गांधी यांच्यावर सभेत आरोप केले होते. गांधी यांनी त्यांचा विरोधदेखील केला होता, मात्र आज चेंबरच्या कार्यकारिणीच्या सभेला गैरहजर राहत गांधींनी ई-मेलद्वारे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यांनी राजीनाम्याचे कोणतेही कारण अद्याप दिले नसून, आपल्या जागी वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र माणगावे यांना अध्यक्षपदाची सूत्रे द्यावीत, असे त्यांनी सुचवले होते. घटनेनुसार समितीने माणगावे यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली.
मनमानी कारभार आणि अपारदर्शकता यामुळे गेले अनेक दिवस महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कारभाराविरोधात सदस्यांमध्ये नाराजी होती. संस्थेच्या भविष्याबाबत असलेली अस्वस्थता कमी करण्यासाठी प्रामाणिक, पारदर्शक आणि विश्वासार्ह नेतृत्वाची गरज असल्याचे मतही सदस्यांनी व्यक्त केले. त्यामुळे माजी अध्यक्ष संतोष मांडलेचा आणि ज्येष्ठ सदस्य आशीष पेडणेकर यांनी पुढाकाराने हे बदल करण्यात आले.

रवींद्र माणगावे हे सांगली जिल्ह्यातील सावळवाडी गावचे रहिवासी आहेत. शेतकरी कुटुंबातील पहिले उद्योजक म्हणून त्यांनी यश मिळवले. महाराष्ट्र चेंबरमध्ये सदस्य, कार्यकारिणी सदस्य, उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. कार्यभार स्वीकारल्यावर माणगावे यांनी सभासदांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांना प्राधान्य देण्याचे वचनही त्यांनी या वेळी दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली चेंबरची प्रतिष्ठा नव्या उंचीवर पोहोचेल, असे मंडलेचा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com