एसटीची दिवाळीत हंगामी भाडेवाढ

एसटीची दिवाळीत हंगामी भाडेवाढ

Published on

एसटीची दिवाळीत हंगामी भाडेवाढ
तिकिटे १० टक्के महागणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर अशी २० दिवसांसाठी ही भाडेवाढ असणार आहे. या भाडेवाढीमुळे महामंडळाच्या तिजोरीत सुमारे एक हजार ते एक हजार १०० कोटींचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे. भाडेवाढीमुळे राज्यातील नागरिकांचा एसटीचा लांबपल्ल्याचा प्रवास ९० ते १०० रुपयांनी महागणार आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक कुटुंबे गावी जातात, पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे बेत आखतात. दिवाळीला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन महामंडळ दरवर्षी जादा गाड्यांची घोषणा करते. दिवाळी आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्नवाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करते. गर्दीच्या हंगामात राज्य परिवहन प्राधिकरणाने ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यास एसटी महामंडळाला मान्यता दिली आहे. त्यानुसार गर्दीच्या हंगामात तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ केली जाते. यंदादेखील १० टक्के हंगामी भाडेवाढ केली जाणार आहे. साध्या, विठाई, शिवशाही, निमआराम बसकरिता ही भाडेवाढ लागू असणार आहे. मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीकरिता भाडेवाढ लागू असणार नाही.
...
गाडीच्या प्रकारांनुसार तिकीट दर (रुपयांंत)
गाडीचा प्रकार ---- सध्याचे तिकीट (प्रतिटप्पा) ---- दिवाळीत तिकीट
साधी (मिडी, साधी)-----१०.०५-------११.०५
जलद-----१०.५ ------११.०५
निमआराम-----१३.६५ -----१५
साधी शयनआसनी-----१३.६५ ---१५
साधी शयनयान----१४.७५ -----१६.२५
एसी शिवशाही (आसनी)----१४.२०----१५.६५
एसी जनशिवनेरी (आसनी)-----१४.९०----१६.४०
...

मार्गानुसार तिकीट दर (अंदाजित रुपयांत)
मार्ग---सध्याचे तिकीट---दिवाळीतील तिकीट
परळ-कोल्हापूर (साधी)-------६४०-----------७००
मुंबई-मालवण (शिवशाही)-------१,३००----------१,४००
मुंबई-जळगाव (स्लीपर)---१,१००---------१,२५०
मुंबई-छत्रपती संभाजीनगर (साधी)-----८००---------९००
मुंबई-सोलापूर (साधी)---------७५० ---------- ८५०
मुंबई-जालना (साधी)-------८००----------९००
मुंबई-लातूर (साधी)--------९०० -----------१,०००
मुंबई-सांगली (साधी)-----७३० ---------८००
मुंबई-रत्नागिरी (साधी)------६०० --------७००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com