राज्यातील रेल्वे प्रवास धोक्याचा

राज्यातील रेल्वे प्रवास धोक्याचा

Published on

राज्यातील रेल्वे प्रवास धोक्याचा
२० टक्के गुन्हे महाराष्ट्रात; चोरी, हाणामारी, विनयभंग, अपहरणाच्‍या गुन्ह्यांत वाढ

मुंबई, ता. १ : रेल्वेने दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांत प्रवास करताना मुंबई, विशेषतः महाराष्ट्रातील प्रवासी सतर्क असतात. मात्र प्रत्यक्षात परराज्यातील प्रवाशांनी महाराष्ट्रात प्रवास करताना ही काळजी घेणे अपेक्षित असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोचा अहवाल सुचवतो. भारतीय रेल्वेच्या मालमत्तेसोबत प्रवाशांची सुरक्षा आणि तपासाची जबाबदारी असलेल्या राज्य रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) या यंत्रणांनी देशभरात नोंदवलेल्या गुन्ह्यांपैकी तब्बल २० टक्के गुन्हे एकट्या महाराष्ट्रात घडल्याचे ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीतून समोर आले आहे.

एनसीआरबीने जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार २०२३ साली जीआरपी आणि आरपीएफ या दोन्ही यंत्रणांनी मिळून संपूर्ण देशात ९.५५ लाख गुन्हे नोंदवले. त्यातील १.८२ लाख गुन्हे महाराष्ट्रातील विविध रेल्वे पोलिस ठाण्यांमध्ये नोंद आहेत. या अहवालानुसार २०२१ मध्ये राज्यात रेल्वेत झालेल्या १.०७ लाख गुन्ह्यांची नोंद झाली, तर २०२३मध्ये ती वाढून १.८२ लाख इतकी झाली. दोन वर्षांत तब्बल ७५ हजार गुन्हे वाढले.


देशभरात जीआरपीने नोंदवलेल्या गुन्ह्यांचा सहा तर आरपीएफने नोंदवलेल्या गुन्ह्यांचा दर (क्राइम रेट) ६३ टक्के इतका आहे. अर्थात दर लाख लोकसंख्येमागे देशात सरासरी ६९ गुन्हे घडतात. महाराष्ट्रात हा दर १४३ इतका असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्राखालोखाल गुजरात, झारखंड, बिहार आणि दिल्लीचा नंबर लागतो.


चोरी, विनयभंग, हाणामारीचे गुन्हे जास्त
महाराष्ट्रात रेल्वेत सर्वाधिक मालमत्ता चोरी, जबरी चोरी आणि दरोड्याचे गुन्हे नोंद झाले आहेत. संपूर्ण देशात रेल्वेची मालमत्ता, प्रवाशांचे सामान, किमती ऐवज चोरीचे एकूण ६२,१७३ गुन्हे नोंद झाले. त्यातील २२,६०१ गुन्हे महाराष्ट्रात घडले. हे प्रमाण एकूण गुन्ह्यांच्या ३६ टक्के आहे. त्याखालोखाल मारहाण, गंभीर मारहाण, विनयभंग, बलात्कार आदी मानवी शरीराशी संबंधित १८ टक्के गुन्हे महाराष्ट्रात घडले.


महाराष्ट्रातील गुन्ह्यांची तुलनात्मक आकडेवारी
गुन्हे प्रकार देश महाराष्ट्र टक्केवारी
चोरी ६०,००१ २२,१५७ ३६
जबरी चोरी ९२५ ४०४ ४३
विनयभंग ३५१ १०१ २९
मारहाण ९०८ १६३ १८
अपहरण २४७ ५२ २१
दंगल ३९ ११ २८

उपनगरीय लोकलमुळे गुन्ह्यांत वाढ
मुंबई महानगर प्रदेशातील उपनगरीय लोकल सेवा आणि मुंबईत ये-जा करणाऱ्या ४०० हून अधिक लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसद्वारे दररोज सरासरी ८० लाख प्रवासी प्रवास करतात. लोकल सेवेचे जाळे देशाच्या अन्य शहरांतही आहे. मात्र एमएमआरइतकी प्रभावी सेवा कुठेही नाही. या गर्दीची संधी आणि निमित्ताने चोरी आणि अन्य गुन्हे घडतात, असे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com