थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्रासाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोहीम
थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्रासाठी
सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोहीम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः राज्यातील थॅलेसेमिया रुग्णवाढ आणि सध्या असलेल्या रुग्णांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने शासनाने थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्र मोहीम राबविण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमात सामाजिक संस्थांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी निर्मल भवन येथे झालेल्या ‘एक पाऊल थॅलेसेमियाकडे’ या आढावा बैठकीत म्हटले. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव विलास बेद्रे, संकल्प इंडिया फाउंडेशनचे रजत अग्रवाल, थॅलेसेमिया ग्रुपचे राज्य समन्वयक डॉ. लक्ष्मीकांत पिंपळगावकर, रोटरी क्लबच्या रेखा पटवर्धन तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
थॅलेसेमिया हा आनुवंशिक आजार असून वेळेवर तपासणी व काळजी घेतल्यास या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. थॅलेसेमियाच्या निदानासाठी विशिष्ट तपासण्या अनिवार्य केल्यामुळे वेळेवर निदान होऊन पुढील पिढीत हा आजार पसरण्यापासून रोखता येईल. राज्यातील नागरिकांची थॅलेसेमियाबाबत जागृती करणे, वेळेवर निदान, तपासणी तसेच उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि वैद्यकीय क्षेत्राच्या सक्रिय सहभागातून या उपक्रमाला गती मिळणार आहे. थॅलेसेमियाबाबत जनजागृतीकरिता रोटरी क्लबसमवेत सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.
.................
सकारात्मक बदल घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील
थॅलेसेमिया रुग्णांत सकारात्मक बदल घडविण्यासाठी आणि पुनर्वसनासाठी शासन प्रयत्नशील आहे. या अंतर्गत रुग्णांना रक्त संक्रमणाची सोय, बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारख्या आधुनिक उपचारपद्धती दिल्या जात आहेत. या आजारावरील वैद्यकीय उपचारपद्धती प्रगत झाल्या असून, याविषयी आणखी जनजागृती होणे आवश्यक आहे. यामुळे रुग्णांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल, असे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.