कर्करोगासाठी सर्वसमावेशक धोरण स्वागतार्ह पाऊल

कर्करोगासाठी सर्वसमावेशक धोरण स्वागतार्ह पाऊल

Published on

कर्करोगासाठी सर्वसमावेशक धोरण स्वागतार्ह पाऊल
आरोग्य यंत्रणा बळकटीची गरज; वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : राज्यातील कर्करोगग्रस्तांना दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणाचे आरोग्यतज्ज्ञ व या क्षेत्रात काम करणाऱ्या आरोग्य कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे; मात्र हे धोरण प्रत्यक्षात राबवले तरच कर्करुग्णांना सेवा मिळेल, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

कर्करुग्णांसाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन (महाकेअर फाउंडेशन) कंपनी स्थापन करण्याचा तसेच या माध्यमातून राज्यभरातील १८ रुग्णालयांतून कर्करोगाशी निगडित विशेषोपचार उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. याची प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न होण्याची गरजही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर रुग्णाला किमान १० ते १५ ‘केमो’ घ्यावा लागतो. चार ते पाच वेळा रेडिओथेरपीसाठी यावे लागते, ९० टक्के मुले या थेरपीनंतर सर्वसामान्य आयुष्य जगतात. सर्वसमावेशक धोरण राबवणे ही स्वागतार्ह बाब आहे, पण केंद्रात सर्व सुविधा आणि सेवा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मुंबईच्या रेफरल रुग्णालयांसारखे व्हायला नको, ही तत्त्वतः कल्पना चांगली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


कर्करोग रुग्णांचे प्रमाण अलीकडे वाढले आहे; कारण निदानपद्धती अधिक प्रगत आहे. निदान झाल्यावर वेळ न वाया घालवता उपचार घेणे आवश्यक आहे. आता केमोथेरपी, इम्युनोथेरपी उपलब्ध आहे. या धोरणामुळे डॉक्टर्स, उपचार पद्धती, केमोथेरपी, रेडिओथेरपी उपलब्ध झाली, गावागावातून केंद्र उपलब्ध करून दिली तर रुग्णांना उपचारांसाठी मुंबईत येण्याची आवश्यकता पडणार नाही.
- डॉ. अविनाश सुपे, माजी अधिष्ठाता, केईएम

टाटा रुग्णालयावरचा रुग्णभार कमी करण्यासाठी नव्हे तर रुग्णांना घराजवळ उपचार मिळावेत, यासाठी हे धोरण आहे. टाटाच्या हब अँड स्पोक मॉडेलच्या पार्श्वभूमीवर हे धोरण राबविले जाईल. यामध्ये तीन पातळीवर उपचार होणार आहेत. लोकसंख्येनुसार ही केंद्रे कार्यान्वित होतील. रुग्णाला मुंबईत येण्याची गरज पडू नये, यासाठी हे धोरण महत्त्वाची भूमिका बजावेल. रुग्ण मुंबईत येईपर्यंत व उपचार सुरू होईपर्यंत फार वेळ जातो. तोपर्यंत त्याची प्रकृती आणखी गंभीर होते.
डॉ. श्रीपाद बनवली, शैक्षणिक संचालक, टाटा रुग्णालय


टाटा रुग्णालयात रुग्ण जास्त असल्यामुळे तिकडे सुविधा आणि उपचार मिळणे कठीण आहे. नवीन काहीतरी उपक्रम सुरू करण्यापूर्वी आता जी रुग्णालये- खासगी, सरकारी आणि इतर संस्था त्यांना सक्षम करणे आवश्यक आहे. नव्या यंत्रणा उभारणे ही गोष्ट जरी चांगली असली तरी उपचार सुविधा आणि त्यासाठी यंत्रणा सोईस्कर असावी.
- नयना कनाल, अध्यक्ष, पहिले माझे कर्तव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com