एकनाथ शिंदे सामान्यांसाठी लढणारे नेते
एकनाथ शिंदे सामान्यांसाठी लढणारे नेते
गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिवसैनिकांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : ग्रामीण भागातील समस्या असो किंवा शहरी भागातील समस्या असो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर समस्या सोडवतातच, एकनाथ शिंदे हे सामान्य लोकांसाठी लढणारे नेते आहेत, अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा गुरुवारी (ता. २) आयोजित करण्यात आला होता, या वेळी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
नेस्को सेंटर येथील मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल झाले होते. कल्याण, पालघर, नाशिक, पुणे, सातारा आदी भागांतून शेकडो कार्यकर्ते आले होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दसरा मेळावा होता. त्यामुळे एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना काय संदेश देतील, यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक पाहता, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढतील, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर आव्हान निर्माण होऊ शकते; मात्र कोणीही एकत्र आले तरी शिंदेच्या शिवसेनेला फरक पडणार नाही, आम्हचाच भगवा पालिकेवर फडकेल, असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना मदतीचा हात दिला आहे. ते खूप चांगले नेते आहोत. त्यामुळे आम्ही मेळाव्याला आलो आहोत.
- लक्ष्मी देवले, शिवसैनिक
महापालिका निवडणुका पाहता आजचा दसरा मेळावा महत्त्वाचा आहे. शहरातील वेगवेगळ्या समस्या सोडविण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यांच्या कामाच्या सपाट्यामुळे लोक शिवसेनेत दाखल होत आहेत. काश्मीर हल्ला असो किंवा राज्यातील पूर शिंदे लोकांच्या मदतीला धावून येत आहेत.
- अंजली नाईक, माजी नगरसेविका
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले आहेत. त्यामुळे महापालिकाच्या निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही. महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना युतीलाच यश मिळेल.
- हारून खान, माजी नगरसेवक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे नेण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. पक्ष बांधणीसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे.
- परमेश्वर कदम, माजी नगरसेवक
एकनाथ शिंदे यांनी अनेक ठिकाणी काम केले आहे. त्यांच्याकडे मदत मागितली असता तत्काळ धाऊन येतात. त्यांच्या या स्वभावाला आकर्षित होऊनच आम्ही गोवंडी येथून १०० ते १५० लोक आलो आहोत.
- अहमद आली शेख, शिवसैनिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.