नवरात्रोत्सवात ६,२३८ सदनिकांची विक्री

नवरात्रोत्सवात ६,२३८ सदनिकांची विक्री

Published on

नवरात्रोत्सवात ६,२३८ सदनिकांची विक्री
सरकारच्या तिजोरीत ५७८ कोटींचा महसूल; २० टक्क्यांची वाढ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : नवरात्रोत्सवात मुंबईत तब्बल ६,२३८ सदनिकांच्या विक्रीची नोंदणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या कालावधीत सुमारे २० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. या मालमत्ता नोंदणीतून राज्य सरकारच्या तिजोरीत जवळपास ५७८ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील रिअल इस्टेट क्षेत्रात सातत्याने सकारात्मक वाढ नोंदली जात असून, हीच वाढ नवरात्रोत्सवातही कायम राहिली. सुरुवातीला पितृपंधरवड्यात घर खरेदीचा वेग मंदावला; मात्र नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या शुभ महूर्तावर घर खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र होते. अवघ्या १० दिवसांत ६,२३८ घरांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी हाच आकडा ५,१९९ होता, तर २०२३ च्या नवरात्रोत्सवात चार हजार ५९४ घरांची विक्री झाल्याचे नाइट फ्रॅंक इंडिया या संस्थेच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. या घरांमध्ये ९०० ते १००० चौरस फुटांच्या घरांची संख्या जास्त आहे.

नवरात्रोत्सवातील घर खरेदी
दिवस घरांची नोंदणी महसूल (कोटींमध्ये)
पहिला दिवस - ६८५ ६३
दुसरा दिवस - ६७४ ६४
तिसरा दिवस - ६५९ ६०
चौथा दिवस - ९४२ ८३
पाचवा दिवस - ९३४ ८३
सहावा दिवस - २८० २४
सातवा दिवस - ० ०
आठवा दिवस - ६०६ ५६
नववा दिवस - ७३८ ८१
दहावा दिवस - ७२९ ७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com