सायबर तंत्रज्ञान तरुणांची मने हॅक करू शकते!
सायबर तंत्रज्ञान तरुणांची मने हॅक करू शकते!
किंवा
हॅकिंग भविष्यातला सर्वात मोठा धोका
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस : वेळीच उपाययोजना आवश्यक
मुंबई, ता. ३ : हॅकिंग केवळ डेटा चोरी किंवा आर्थिक फसवणुकीपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. वेगाने उदयास येणारे नवनवीन तंत्रज्ञान तरुणांचे किंवा संपूर्ण पिढीचे मन हॅक करून अराजकता पसरवू शकते. हा भविष्यातला सर्वात मोठा धोका आहे. त्याविरोधात आपल्याला लढा द्यावा लागणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्य पोलिस मुख्यालयात केले.
राज्य पोलिसांनी हाती घेतलेल्या ‘सायबर जनजागृती महिना’ या विशेष जनजागृती मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. अभिनेता अक्षयकुमार, अभिनेत्री राणी मुखर्जी, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, सायबर महाराष्ट्राचे प्रमुख यशस्वी यादव आदी या वेळी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले, ‘राज्यात सशस्त्र नक्षलवादाचा बीमोड करण्यात यश मिळाले आहे; मात्र नागरिकांची मने भडकावून त्यांच्यात शासनव्यवस्था, न्यायव्यवस्था आणि संविधानाबाबत सतत शंका निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात. हिंसा न करताच देशविरोधी कृतीसाठी चिथावले जाते, ही शहरी नक्षलवादाची रणनीती आहे.’
सायबर विश्वात रोज उदयास येणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जोरावर एक व्यक्ती एखाद्या खोलीत बसून देशविरोधी, संविधानविरोधी मतप्रवाह तरुणांत भिनवून अख्ख्या पिढीचे मन हॅक करू शकतो. आज चॅटबाेट्स एखाद्यासाठी मानसशास्त्रज्ञाप्रमाणे मदत करतात. एखाद्याचे समुपदेशनही करतात. ही झाली सकारात्मक बाजू; पण याच तंत्रज्ञानाने तरुणांची माथी भडकावण्याचे उपद्व्याप होऊ शकतात, अशी भीती फडणवीस यांनी व्यक्त केली.
आजची तरुण पिढी निडर असून, ती प्रसंगी सरकारलाही प्रश्न विचारते. नागरिक म्हणून हा त्यांचा हक्क आहे आणि या कृतीचे स्वागत आहे; पण सायबर तंत्रज्ञानाद्वारे हेतुपुरस्सर तरुणांच्या मनात अराजकतेची बीजे पेरली जाऊ शकतात. या धाेक्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.