मास्टर लिस्टवरील ७० विजेत्यांच्या घराचा हक्क रद्द होणार

मास्टर लिस्टवरील ७० विजेत्यांच्या घराचा हक्क रद्द होणार

Published on

मास्टर लिस्टवरील ७० विजेत्यांच्या घराचा हक्क रद्द होणार
म्हाडा एकतर्फी कारवाईच्या तयारीत; कारणे दाखवा नोटीसला प्रतिसाद न दिल्याचा फटका बसणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील विजेत्यांना हक्काचे घर देण्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने डिसेंबर २०२३ मध्ये २६५ घरांसाठी लॉटरी काढली होती. त्यापैकी जवळपास ७० लोकांनी दीड वर्षानंतरही घराचा ताबा घेतलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर पाठवलेल्या करणे दाखवा नोटीसलाही प्रतिसाद त्यांनी दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर घराचा हक्क रद्द करण्याची एकतर्फी कारवाई करण्याच्या म्हाडाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे संबंधित विजेत्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
उपकरप्राप्त (सेस) जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीची जागा कमी असल्याने किंवा सदरचा भूखंड पालिकेच्या आरक्षणामुळे बाधित झाला असेल, रस्त्यात गेला असेल, तर त्यावर नव्याने इमारत उभारता येत नाही. त्यामळे अशा बाधित इमारतीमधील रहिवाशांचा म्हाडाकडून मास्टर लिस्टमध्ये समाविष्ट केला जातो. त्यांना इतरत्र पुनर्रचित इमारतीमधील अतिरिक्त सदनिका मालकी तत्त्वावर दिल्या जातात. म्हाडाने २०२३ मध्ये २६५ रहिवाशांना घरे देण्यासाठी ऑनलाइन लॉटरी काढली होती. त्यानुसार संबंधितांनी म्हाडाला स्वीकृती पत्र देऊन ४५ दिवसात घर स्वीकारने बंधनकारक आहे. त्यानुसार म्हाडाने आलेल्या स्वीकृती पत्राच्या आधारे १७२ जणांना देकार पत्र दिले आहे. केवळ ९३ जणांनी घराचा ताबा घेतला असून, जवळपास ७० जणांनी दीड वर्ष झाले तरी घराचा ताबा घेण्यास पुढे आलेले नव्हते. त्यामुळे म्हाडाने त्यांना करणे दाखवा नोटीस पाठवली होती, मात्र त्याला जवळपास दीड महिना होऊन गेला तरी संबंधित विजेत्यांकडून कोणताच प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे घराचा हक्क रद्द करण्याबाबतची एकतर्फी कारवाई केली जाणार आहे. त्याला प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर त्याची कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे.

- एकूण घरांची सोडत - २६५
- स्वीकृती दिलेले विजेते - १९८
- स्वीकृती न दिलेले विजेते - ३३
- देकार पत्र दिले - १७२
- घराचा ताबा दिला - ९३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com