घाटकाेपर सशस्त्र लुटीत 
महाविद्यालयीन विद्यार्थी

घाटकाेपर सशस्त्र लुटीत महाविद्यालयीन विद्यार्थी

Published on

घाटकाेपर सशस्त्र लुटीत
महाविद्यालयीन विद्यार्थी

दोघांना बेड्या; तिसऱ्याचा शोध सुरू

मुंबई, ता. १६ ः झटपट श्रीमंतीच्या हेतूने घाटकोपरच्या सराफा दुकानात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सशस्त्र लूट केल्याचा धक्कादायक प्रकार तपासात उघड झाला आहे. याप्रकरणी तनीश भैसाडे (वय २०), सूरज यादव (२०) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना २३ नाेव्‍हेंबरपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे. चंद्रकिरण यादव (वय २०) याचा शाेध सुरू आहे. तिघेही वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहेत.

यादवची प्रेयसी तनीश, सूरजसोबत शिकत होती. तिला भेटण्याच्या निमित्ताने यादवची या दोघांसोबत ओळख झाली होती. पुढे तिघे मित्र झाले. त्यांनी झटपट श्रीमंत होण्यासाठी अमृतनगर येथील अन्य एका सराफा दुकानात लूटमार करण्याचा कट आखला होता. दोन दिवस तिघांनी तेथे पाळत ठेवली होती. बुधवारी तिघे त्या दुकानाऐवजी दर्शन ज्वेलर्स दुकानात शिरले.

बॅगेमुळे तपासाला दिशा
चाकू, बंदुकीचा धाक दाखवूनही दुकान मालक दर्शन मिटकरी यांनी आरोपींचा प्रतिकार केला. आरोपींच्या हल्ल्यात जखमी होऊनही ते आरडाओरडा करून मदत मागत होते. त्यामुळे घाबरलेले आरोपी हाती आलेले दागिने घेऊन पळले. त्यात यादवची बॅग तेथेच पडली. त्यात त्याचे आधार कार्ड होते. त्याआधारे पोलिसांनी त्याचा मोबाइल क्रमांक मिळवून तांत्रिक तपासाआधारे सूरज, तनीश यांचा नेमका ठावठिकाणा शोधला आणि त्यांना बुधवारी संध्याकाळी या दोघांना मरोळ येथून अटक केली. चोरलेले दागिने आणि गुन्ह्यात वापर झालेली बंदूक यादवकडे असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com