सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावणार
सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी सफाई कामगारांना दिला. साटम यांनी दिवाळीनिमित्त कांदिवली पश्चिमेतील एकतानगरमधील सफाई कामगार वसाहतीमध्ये सफाई कामगारांसोबत घरांच्या प्रश्नावर चर्चा केली आणि त्यांच्यासोबत स्नेहभोजन केले.
साटम यांनी सफाई कामगारांसाठी घरांच्या योजनांबाबतही चर्चा केली. हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली. या दिवाळी कार्यक्रमासाठी भाई गिरकर यांनी पुढाकार घेतला होता. मुंबई शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कामगारांचे त्यांनी आभार मानले. ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ याअंतर्गत आमदार अमित साटम यांनी कामगारांच्या अडचणी आणि अपेक्षा समजून घेतल्या. तसेच शहराच्या विकासासाठी त्यांच्या काही महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी नोंदवून घेतल्या.
-------------------