एमसीए निवडणुकीचे भवितव्य आज ठरणार

एमसीए निवडणुकीचे भवितव्य आज ठरणार

Published on

एमसीए निवडणुकीचे भवितव्य आज ठरणार
उच्च न्यायालयात सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ५ : मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) निवडणुकीचा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला असून, त्यावर उद्या (ता. ६) सुनावणी ठेवण्यात आली आहे. तोपर्यंत पात्र उमेदवारांची यादी जाहीर न करण्याचे अंतरिम आदेश न्यायालयाने प्राथमिक सुनावणीवेळी दिले. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या सुनावणीवर या निवडणूक प्रक्रियेचे भवितव्य ठरणार आहे.
घटनेचे उल्लंघन होणे आणि नियमबाह्यपणे १५५हून अधिक क्रिकेट क्लबना मतदार यादीत समाविष्ट करणे या मुद्द्यांवर एमसीएचे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळबे यांच्यासह अन्य सदस्यांनी या निवडणूक प्रक्रियेला आव्हान दिले आहे. असोसिएशनच्या या निवडणुकीसाठी २४ ऑक्टोबरला निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अंतिम उमेदवार यादीवर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेत आपल्या हरकती नोंदवल्या होत्या. परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणतीही कारणे न देता त्यांच्या हरकती फेटाळल्या आणि २४ ऑक्टोबरला थेट अंतिम उमेदवार यादी जाहीर केल्याचा आरोप याचिकेत केला आहे. एमसीएच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणत्या आधारावर आपल्या हरकती फेटाळल्या त्याची कारणे निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेली नाहीत. ती कारणे सविस्तरपणे देण्याची आदेश निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मुख्य मागणी याचिकेत केली आहे. दुसरीकडे प्रारूप मतदार यादीविषयी १७ ते २० ऑक्टोबरदरम्यान आलेल्या आक्षेपांचा विचार केल्यानंतरच अंतिम यादी जाहीर केली. त्या प्रक्रियेत याचिकाकर्त्यांच्या आक्षेपांचाही विचार केल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
...
राजकीय नेते रिंगणात
एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांचा सहभाग असून, या निवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) मिलिंद नार्वेकर यांचा समावेश आहे. याशिवाय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांनीही अर्ज दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com