सेवानिवृत्त दाम्पत्याची १.६८ कोटींना फसवणूक

सेवानिवृत्त दाम्पत्याची 
१.६८ कोटींना फसवणूक
Published on

सेवानिवृत्त दाम्पत्याची
१.६८ कोटींना फसवणूक

नामांकित कंपनीचे नाव वापरून विश्वास संपादन

मुंबई, ता. ६ : पूर्व उपनगरात राहणाऱ्या सेवानिवृत्त दाम्पत्याची सायबर भामट्यांनी फसव्या शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे एक काेटी ६८ लाख रुपयांची फसवणूक केली. एका नामांकित परदेशी गुंतवणूक सल्लागार कंपनीचे नाव वापरून या दाम्पत्याचा विश्वास संपादित केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात (पूर्व) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान झाली आहे. तक्रारदार हे एचपीसीएल कंपनीतून निवृत्त झाले आहेत. त्यांची पत्नी महापालिकेच्या निवृत्त शिक्षिका आहेत.
वृद्धाने महिनाभरात स्वतःच्या आणि पत्नीच्या बँक खात्यातील सुमारे एक काेटी ६८ लाख रुपये या व्हॉट्सॲप समूह प्रमुखांच्या सांगण्यानुसार निरनिराळ्या बँक खात्यांत भरले. यातील ८० लाख काढून घेण्याचा प्रयत्न केला असता, या रकमेतून आणखी शेअर विकत घेतल्याचे वृद्धास सांगण्यात आले. परस्पर हा व्यवहार झाल्याने तक्रारदारास आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली.
----
अशी झाली फसवणूक
- सप्टेंबरच्या अखेरीस तक्रारदारास अनोळखी मोबाईल क्रमांकावरून परस्पर व्हॉट्सॲप समूहात सहभागी करून घेतले.
- हा समूह कॉन्फर वेल्थ मॅनेजमेंट या ब्रिटनमधील नामांकित कंपनीच्या मार्गदर्शनाखाली शेअर गुंतवणूक करतो, असे भासवण्यात आले.
- वृद्धाने कॉन्फर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीबाबत माहिती घेतली असता ही कंपनी नोंदणीकृत आणि नामांकित असल्याने त्याचा या समूहावर विश्वास बसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com