सकाळ इन्फ्रा हाऊसिंग कॉनक्लेव्ह
मान्यवरांच्या उपस्थितीत होणार
सकाळ इन्फ्रा अँड हाउसिंग कॉन्क्लेव्ह
तज्ज्ञांचे सोमवारी विचारमंथन
मुंबई, ता. ७ : विविध क्षेत्रांतील मान्यवरांना एकाच व्यासपीठावर आणून पायाभूत सुविधा आणि घरबांधणी क्षेत्रावर सर्वंकष चर्चा घडवून आणण्याचा उपक्रम ‘सकाळ’ने येत्या सोमवारी आयोजित केला आहे. या इन्फ्रा अँड हाउसिंग कॉन्क्लेव्हमध्ये घरबांधणी, नगरनियोजन, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांतील मान्यवर, तज्ज्ञ विचारमंथन करून या क्षेत्राला नवी सुनियोजित दिशा देण्याचा प्रयत्न करतील. ही कॉन्क्लेव्ह हॉटेल सहारा स्टारमध्ये होणार आहे. यात या क्षेत्रांशी संबंधित विविध वरिष्ठ सनदी अधिकारी, प्रशासनातील निर्णयकर्ते आणि अग्रगण्य उद्योजक आपले विचार मांडतील. या कार्यक्रमात प्रवेश आमंत्रितांसाठीच असेल.
भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होत असतानाच यामागे देशातील औद्योगिक वाढीचा प्रमुख वाटा आहे. औद्योगिक वाढीसाठी पायाभूत सुविधा अत्यावश्यक आहेत. बंदरे, महामार्ग, लोहमार्ग, विमानतळ, मेट्रो, उड्डाणपूल, माल साठवणूक गोदामे या सर्व बाबी औद्योगिक वाढीसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे एकंदरीत देशाच्या आर्थिक विकासातही पायाभूत सुविधांचा मोठा वाटा असतो.
एकेकाळी मुंबईची शान असलेले औद्योगिक क्षेत्र, कारखाने आता मुंबईबाहेर स्थलांतरित झाले असले तरी आयटी उद्योग, बँका, वित्तसंस्था, बीपीओ, विविध कंपन्यांची कार्यालये-मुख्यालये मोठ्या संख्येने मुंबईत आली आहेत. आता कार्यालयांमधून संगणक घेऊन बाहेर पडणाऱ्या आयटी अभियंत्यांच्या गर्दीने हा परिसर गजबजला आहे. वाढत्या लोकसंख्येला घरांचीही आवश्यकता असल्यामुळे एकेकाळी छोटी गावे असलेल्या पनवेल, वसई-विरार यांचे रूपांतर आता महानगरांमध्ये झाले आहे. राहण्यासाठी परवडणाऱ्या घरांसोबतच नोकरदारांच्या वाढत्या उत्पन्नामुळे आलिशान घरांची मागणीदेखील वाढते आहे. या नोकरदारांच्या उच्च राहणीमानामुळे एकाच घरात दोन-दोन मोटारी असताना त्यासाठी शहरात रस्ते, पूल आदींचे जाळे बांधणेही आवश्यक आहे. त्याच मार्गावर सध्या मुंबईची, महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे, त्याचाच आढावा या माध्यमातून घेतला जाणार आहे.
...
सुंदर भविष्य, सुंदर नगरे
आधुनिकीकरणामुळे निर्माण होणाऱ्या या गरजा आणि त्याचबरोबर त्यातून उत्पन्न होणाऱ्या विविध समस्या, त्यावरील उपाय या सर्व बाबतीत सर्व बाजू तपासण्याची गरज आहे. त्यासाठी या क्षेत्रातील सर्व मान्यवरांना एकत्र आणून विचारमंथनाची आणि मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. यातूनच पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण या क्षेत्राचे सुंदर भविष्य आणि सुंदर नगरे उभे राहू शकतात, या हेतूने ‘सकाळ’तर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

