मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली

मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली

Published on

मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली
‘एक्यूआय’ १४५वर; तापमानात घट होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः पाऊस थांबला आणि कमाल तापमान कमी होऊ लागले, त्यामुळे महानगरातील हवेची गुणवत्ता खालावण्यास सुरुवात झाली. मुंबईची सरासरी हवेची गुणवत्ता शुक्रवारी (ता. ७) १४५ एक्यूआयवर पोहोचली. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, मुंबईचे तापमान आणखी खाली येण्याची शक्यता असून रात्रीचे तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल.

ऑक्टोबरपासून मुंबईची हवेची गुणवत्ता खराब होऊ लागली होती. शहराची सरासरी हवेची गुणवत्ता २०० ‘एक्यूआय’च्या जवळ पोहोचली होती. दरम्यान, २४ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत अवकाळी पावसामुळे, हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारली. दरम्यान, शुक्रवारी मुंबईतील प्रदूषण पातळी वाढून असमाधानकारक पातळी गाठली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वायू प्रदूषण देखरेख ॲप ‘समीर’च्या मते, विलेपार्ले येथे शुक्रवारी सर्वात वाईट हवेची गुणवत्ता २३० एक्यूआय नोंदवली गेली. गोवंडी येथे १९२ एक्यूआय शिवडी येथे १८४ आणि घाटकोपर येथे १७२ एक्यूआय नोंदवले गेले, तर कुलाबा, बोरिवली आणि भायखळा येथे १०० पेक्षा कमी एक्यूआय नोंदवले गेले, जे मध्यम मानले जाते.

मुंबईचे कमाल तापमान शुक्रवारी ३२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान तज्ज्ञ राजेश कपाडिया यांच्या मते, ८ ते १० नोव्हेंबरदरम्यान दिवसाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल आणि १० नोव्हेंबरपर्यंत किमान तापमान २३ अंश सेल्सिअसवरून १९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com