मुंबईतील एक हजार एसआरए इमारतींना आपत्कालीन जीना!
मुंबईतील एक हजार एसआरए इमारतींना आपत्कालीन जिना!
रहिवाशांना खर्चाचे नो टेन्शन; एसआरए प्राधिकरण उचलणार खर्चाचा भार
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत उभारलेल्या मुंबईतील तब्बल एक हजार सात मजली जुन्या इमारतींना आता बाहेरील बाजूने आपत्कालीन लोखंडी जिना लागणार आहे. त्यामुळे या इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या लाखो रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या इमारतीला असलेला चिंचोळा जिना, आपत्कालीन लिप्ट नसल्याने इमारतीला आग लागल्यास किंवा अन्य आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास रहिवासी अडकून पडतात. त्या पार्श्वभूमीवर १९९०च्या दशकात उभारलेल्या सातमजली इमारतींना लोखंडी जिना उभारण्यात येणार असून, त्याला राज्य सरकारने तत्त्वता मान्यता दिली आहे. त्याचा खर्च एसआरए प्राधिकरण करणार असल्याने रहिवाशांना खर्चाचे टेन्शन असणार नाही.
झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्यासाठी राज्य सरकारकडून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून (एसआरए) खासगी विकसकांकडून पुनर्वसन प्रकल्प राबवले जात जातात. १९९५ ते २००० या सुमारे पाच-सहा वर्षांच्या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरांत सुमारे एक हजार पाच-सात मजली इमारती उभा राहिलेल्या आहेत. नियमानुसार त्यांना अग्निशमक यंत्रणा बसवणे बंधनकारक असले तरी इमारती जुन्या झालेल्या असल्याने ते शक्य नाही. त्यामुळे एसआरए प्राधिकरणाने या इमारतींना आपत्कालीन लोखंडी शिडी उभारण्याचा प्रस्ताव राज्याच्या गृहनिर्माण विभागाला पाठवला होता. त्याला राज्य सरकारने तत्त्वता मंजुरी दिली असल्याची माहिती एसआरएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत लोखंडी शिड्या उभारण्याचे काम सुरू होणार आहे. परिणामी आपत्कालीन परिस्थितीत या जिन्याद्वारे रहिवाशांना बाहेर काढणे शक्य होणार आहे.
१८०-२२५ चौरस फुटांची घरे
एसआरए पुनर्विकास योजनेंतर्गत १९९५ ते २००० या कालावधीत मुंबईतील अनेक झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करीत पाच-सातमजली इमारती उभरल्या आहेत. त्यामध्ये सुमारे १८०-२२५ चौरस फुटांच्या सदनिका आहेत. या इमारतींना आपत्कालीन लिफ्टची सोय नाही. त्यामुळे इमारतीला आग लागल्यास किंवा अन्य दुर्घटना घडल्यास लोकांना बाहेर काढणे कठीण होत असल्याने आपत्कालीन लोखंडी जिना उभारण्याचा पर्याय पुढे आला आहे.
खर्चावर काम सुरू
मुंबई शहर आणि उपनगरांत जवळपास एक हजार पाच-सात मजली इमारती आहेत. या इमारतींच्या ठिकाणी लोखंडी गोलाकार आपत्कालीन जिना उभारण्यासाठीचा खर्च एसआरए प्राधिकरण करणार आहे. त्यामुळे किती खर्च येईल यावर काम सुरू असून, लवकरच खर्चाचा अंतिम आराखडा तयार होईल, असेही एसआरएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
प्रीमियममधून मिळणारा निधी वापरणार
एसआरए प्रकल्प राबवताना एसआरए प्राधिकरणाला विकसकांकडून प्रीमियमपोटी निधी मिळतो. त्यामधून एसआरए इमारतींना आपत्कालीन शिडी उभारण्यासाठी येणारा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे संबंधित इमारतीसध्ये वास्तव्यास असलेल्या रहिवाशांवर कोणताही भर पडणार नाही.
अग्निशामक यंत्र बंधनकारक
एसआरएअंतर्गत उभारलेल्या पाच-सहा मजली इमारती अग्निशमन यंत्रणा बसवणे शक्य नाही. त्यामुळे या इमारतींच्या प्रत्येक मजल्यावर अग्निशामक यंत्र लावणे बंधनकारक आहे. त्यासाठी दर सहा महिन्यांना प्राधिकरणाकडून संबंधित हाइसिंग संस्थांना स्मरण पत्र दिले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

