‘वंदे मातरम्’चा विसर हा 
राष्ट्रभावनेचा अपमान!

‘वंदे मातरम्’चा विसर हा राष्ट्रभावनेचा अपमान!

Published on

‘वंदे मातरम्’चा विसर हा
राष्ट्रभावनेचा अपमान!

आमदार अमित साटम यांची टीका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः मतांच्या राजकारणात अडकून पडलेल्या काही पक्षांनी ‘वंदे मातरम्’कडे पाठ फिरवली आहे. हा केवळ या गीताचा नाही, तर राष्‍ट्रभावनेचा अपमान आहे, अशी टीका भाजपचे आमदार अमित साटम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे.

‘वंदे मातरम्‌’ला नुकतीच दीडशे वर्षे पूर्ण झाली असून त्यावरून आता नव्‍या वादाला ताेंड फुटले आहे. साटम म्हणाले, देशभरात ‘वंदे मातरम्’चा गौरव साजरा होत असताना, काहींना तो दिवस आठवला नाही. मतांच्या लांगूलचालनाच्या नादात हे लोक इतके पुढे गेले आहेत की आता त्यांना देशभक्तीचाही विसर पडला का?
मुंबईच्या संस्कृतीत देशभक्ती आणि राष्ट्रभावना खोलवर रुजलेली आहे. या शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत त्यांना मुंबईकर कधीच माफ करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
-----
‘हे गीत अस्तित्वाचे प्रतीक’
आपण आज जे स्वातंत्र्य जगत आहाेत, त्यासाठी दिलेल्या लढ्याच्या प्रेरणेचा स्रोत म्हणजे ‘वंदे मातरम्’ हे गीत आहे. जे लोक देशभक्तीच्या प्रतीकांना बाजूला ठेवून मतांच्या राजकारणात गुंतले आहेत, त्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल. ‘वंदे मातरम्’ हे गीत पुन्हा प्रत्येकाच्या ओठांवर आले पाहिजे. हे आपल्या अस्तित्वाचे प्रतीक आहे, असे साटम यांनी सांगितले.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com