देशातील पहिले भूमिगत वीज उपकेंद्र परळमध्ये कार्यरत
देशातील पहिले भूमिगत वीज उपकेंद्र परळमध्ये कार्यरत
अपुऱ्या जागेवर टाटा पॉवरचा उतारा; पावसाळ्यातही अखंडित वीजपुरवठा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबईची लोकसंख्या आणि अपुरी जागा ही मोठी समस्या असल्याने गगनचुंबी इमारती, उड्डाणपूल, उन्नत मेट्रो, डबल डेकर ब्रिज अशा वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असतानाच आता टाटा पॉवरने जागेअभावी भूमिगत वीज उपकेंद्र उभारले आहे. परळ येथे तब्बल ४०० केव्ही क्षमतेचे हे उपकेंद्र उभारण्यात आले असून, त्या माध्यमातून हजारो घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा केला जात आहे. पावसाळ्यातही हे उपकेंद्र पूर्ण क्षमतेने चालू राहात असल्याने अपुऱ्या जागेच्या किंवा दाटीवाटीच्या ठिकाणी रोल मॉडेल ठरणार आहे.
वीज केंद्रामध्ये तयार होणारी वीज उच्चदाब वीजवाहिन्यांच्या माध्यमातून वाहून आणलेली वीज उपकेंद्राच्या माध्यमातून ग्राहकांना वितरित केली जाते. त्यासाठी प्रत्येक विभागात वीज उपकेंद्र उभारणे आवश्यक असते; मात्र मुंबई शहर आणि उपनगरांत अपुऱ्या जागेमुळे त्यावर मर्यादा येतात. त्यामुळे टाटा पॉवरने परळ येथे अवघ्या ४०० चौरस फूट जागेत भूमिगत सबमर्सिबल सबस्टेशन उभारून कार्यरत केले आहे, तर त्यावरील जागा पार्किंग किंवा अन्य बाबींसाठी वापरता येणार आहे. या उपकेंद्रातून नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यातही ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा केला असल्याने हा भूमिगत उपकेंद्राचा प्रयोग यशस्वी ठरला असल्याचे टाटा पॉवरने स्पष्ट केले आहे. दरम्यान, हे वीज उपकेंद्र पूर्णतः देखभालमुक्त, दूरस्थपणे नियंत्रित करता येणारे आणि हवामान-प्रतिरोधक आहे. त्यातच हे केंद्र पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानंतरही हे सबस्टेशन सुरू राहू शकते. त्यामुळे ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे.
चार वर्षांत १०० हून अधिक वीज उपकेंद्रांची उभारणी
परळमधील भूमिगत सबमर्सिबल वीज उपकेंद्राला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे, पुढील चार वर्षांत मुंबईत अशाप्रकारची १०० हून अधिक भूमिगत वीज उपकेंद्रे उभारण्याची योजना टाटा पॉवरने आखली आहे. ही भूमिगत केंद्रे कमी खर्चिक आणि अतिवृष्टीच्या काळात अखंडित वीजपुरवठ्याची खात्री देणारी ठरणार आहेत. तसेच गर्दीच्या निवासी व व्यावसायिक भागात व्होल्टेज स्थिरतेतही मोठी सुधारणा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

