क्षयराेगाचे निदानासाठी बनवले यंत्र
क्षयराेगाच्या निदानासाठी बनवले यंत्र
पदवीच्या विद्यार्थ्यांची किमया; वेळ, पैशांची हाेणार बचत
मुंबई, ता. ९ : क्षयरोगाचे निदान करण्यासाठी विविध प्रकारच्या तपासण्या आणि त्यातून होणारे संसर्ग, त्यांचा खर्च आणि वेळ यातून सुटका करण्यासाठी मुंबईतील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठातील मुलींनी ‘स्वयंचलित अॅसिड-फास्ट स्टेनिंग डिव्हाइस’ हे यंत्र तयार केले आहे. या डिव्हाइसची माहिती एसएनडीटीच्या जुहू संकुलात भरविलेल्या इनोव्हेशन महाकुंभमध्ये देण्यात आली.
या डिव्हाइससोबत या महाकुंभमध्ये एसएनडीटी विद्यापीठातील मुंबई, पुणे, चंद्रपूर आदी संकुलांसह इतर राज्यांतील विविध विद्यापीठांतील मुलींनी अनेक विषयांतील अनोख्या संकल्पनांचे सादरीकरण केले.
डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठातील अभियांत्रिकी तंत्रज्ञान शाखेच्या श्रेणीतील दीक्षा क्षेत्री, गोरंग गभणे, नचिकेत आटाळे यांनी हे डिव्हाइस विकसित केले असून, त्यांना डॉ. महादेव सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. महाकुंभमध्ये या डिव्हाइसची माहिती देण्यात आली, तर डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी आपल्या विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉलला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे कौतुक केले. भविष्यात भूस्खलन रोखण्यासाठी विकसित करत असलेल्या डिव्हाइसच्या देवांशी सिंग, रिया सिंग, मनस्वी टिपणीस, मिहिका भुरके आणि केयूर कदम यांचेही कुलगुरूंनी कौतुक केले.
--
असे काम करते यंत्र
- क्षयरोग निदानासाठीचे हे मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अॅसिड-फास्ट स्टेनिंगची अचूकता, वेग आणि सुरक्षितता यावर लक्ष केंद्रित करते.
- झीहल-नील्सन तंत्रासारख्या पारंपरिक मॅन्युअल स्टेनिंग पद्धती यात काम करतात. हे उपकरण सूक्ष्म कंट्रोलरचा वापर करून संपूर्ण स्टेनिंग प्रक्रिया नियंत्रित केली जाते.
- स्टेनिंग अनुक्रम स्वयंचलित करून हे डिव्हाइस मानवी त्रुटी कमी करते आणि संसर्गजन्य नमुन्यांचा संपर्क कमी करून अचूक अशी माहिती देते.
-----
(फोटो.. इनोव्हेशन महाकुंभमध्ये क्षयराेग डिव्हाइसच्या स्टॉलवर डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत, डक्सलेगिसचे संचालक व पेटंट तज्ज्ञ ॲड. दिव्युंदू वर्मा आणि विद्यार्थी.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

